QR कोड नसलेल्या जुन्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या समस्येवर तोडगा काढा : नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.

QR कोड नसलेल्या जुन्या जन्म-मृत्यू दाखल्यांच्या समस्येवर तोडगा काढा : नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी.

 (यावल तालुका प्रतिनिधी):

 पूर्वीच्या काळात यावल नगर परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या जन्म व मृत्यू दाखल्यांवर QR Code उपलब्ध नसल्यामुळे तसेच जुन्या नोंदवह्या जीर्ण झाल्यामुळे नागरिकांना नवीन दाखले देणे संदर्भात व विविध कामांमध्ये ऑनलाइन पडताळणी करताना मोठ्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या समस्येवर तातडीने प्रशासकीय व तांत्रिक पर्यायी राष्ट्रीय स्तरावर मार्ग / तोडगा काढून मार्गदर्शन करावे अशी महत्त्वाची मागणी यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांनी जिल्हा निबंधक तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगाव यांच्याकडे लेखी पत्रांन्वये केली आहे.

नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील यांनी दिलेल्या पत्रानुसार, पूर्वीच्या काळात प्रचलित असलेल्या नियमांनुसार जारी करण्यात आलेल्या दाखल्यांवर QR कोड नव्हते मात्र, सद्यस्थितीत विविध शासकीय व खासगी कार्यालयांकडून ऑनलाइन QR कोडद्वारेच पडताळणीची अट घातली जात आहे.जुने दाखले कायदेशीर वैध असूनही,ऑनलाइन पडताळणी होत नसल्याच्या कारणास्तव नागरिकांचे अर्ज वारंवार नाकारले (Reject) जात आहेत.

नागरिकांना शैक्षणिक,बँकिंग व शासकीय कामांत अडचणी --
नगर परिषदेकडे उपलब्ध असलेल्या अनेक जुन्या जन्म-मृत्यूच्या मूळ नोंदवह्या (Registers) काळाच्या ओघात जीर्ण झाल्या आहेत.बऱ्याच प्रकरणांमध्ये नागरिकांकडे मूळ दाखला उपलब्ध नसतो.अशा वेळी नोंदवहीतील नोंदींच्या आधारे नवीन दाखला देताना QR कोड नसणे,ऑनलाइन पडताळणी न होणे आणि इतर तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ, शैक्षणिक प्रवेश,न्यायालयीन कामे,बँकिंग व इतर प्रशासकीय कामांसाठी आवश्यक असलेले दाखले मिळण्यात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या मुख्य मागण्या -- 
QR कोड नसलेल्या जुन्या दाखल्यांना वैध मान्यता मिळावी: जुन्या दाखल्यांना वैध मानण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावेत.जीर्ण नोंदींच्या आधारे नवीन दाखले : जीर्ण नोंदवह्यांमधील नोंदींच्या आधारे नवीन दाखले निर्गमित करण्यासाठी सोपी व स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी.
तांत्रिक उपाययोजना : ऑनलाइन पडताळणीतील अडचणी दूर करण्यासाठी तातडीने तांत्रिक उपाययोजना व मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून द्याव्यात.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच नागरिकांना जन्म मृत्यूचे दाखले तात्काळ मिळण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने या विषयावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊन मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात,अशी रस्ता आणि महत्वाची अपेक्षा नगराध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांनी व्यक्त केली आहे.
Previous Post Next Post