अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; 'Y+' सुरक्षेसाठी राकाँचे (शप) पोलीस अधीक्षकांना निवेदन*

*अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी; 'Y+' सुरक्षेसाठी राकाँचे (शप) पोलीस अधीक्षकांना निवेदन*

 (अकोला मुख्य जिला प्रतिनिधी इमरान खान )

   अकोला:अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री साजिद खान पठाण यांना कथित बिश्नोई गँगच्या (शुभम लोणकर) नावाने वारंवार जीवे मारण्याच्या आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याच्या धमक्या येत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गंभीर घटनेच्या निषेधार्थ आणि आमदार पठाण यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करून त्यांना 'Y+' श्रेणीची सुरक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक महोदय यांना एक सविस्तर निवेदन सादर केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अकोला पश्चिम विधानसभा अध्यक्ष श्री महेमुद खान पठाण यांच्या नेतृत्वाखालील एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकारे उघडपणे धमक्या मिळणे अत्यंत चिंताजनक असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करण्याची मागणी पक्षाने केली आहे.राकाँ (शप) शिष्टमंडळाच्या प्रमुख मागण्या:आमदार साजिद खान पठाण यांना आलेल्या धमक्यांची तात्काळ उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशी व्हावी.धमकी देणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी.तपास पूर्ण होईपर्यंत आणि धोका टळेपर्यंत आमदारांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात यावी.धोक्याचे तात्काळ मूल्यांकन (Threat Assessment) करून आमदार पठाण यांना 'Y+' श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्याचा शिफारस प्रस्ताव राज्य गृह मंत्रालयाकडे पाठवावा.भविष्यात लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी चोख सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी.यावेळी पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष महेमुद खान पठाण यांच्यासह सोनू साहेब, अमीन खान पठाण, नाझिम साहेब, जीशान अमर, कामरान अली, वकार भाई, आवेश भाई, बाबू भाई, सोहेल भाई, शेख इलियास, अबरार अहमद, सतीश सरपती, शेख वसीम, युनूस पठाण, अदनान खान यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि क्षेत्रातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post