अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशीरा आगमन14 सप्टेंबरपासून गणेशोत्सव बड पथक सजावटीसाठी मंडळाची चळवळ सुरु

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशीरा आगमन
14 सप्टेंबरपासून गणेशोत्सव बड पथक सजावटीसाठी मंडळाची चळवळ सुरु


अहिल्यानगर/ प्रशांत बाफना विभागीय संपादक 

हिदू धर्मात प्रत्येक महिन्याचे विशेष महत्व आहे श्रावण या पवित्र महिन्यानंतर भाद्रपद महिन्यात चौथ्या दिवसापासून गणपती उत्सवाला प्रारंभ होतो एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाची माञ आतापासूनच लगबग सुरु असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षा अधिकमास महिना वाढल्यामुळे यंदा 19 दिवस उशिरा गणपती बाप्पाचे आगमन होणार असले तरी गणपती मडळे बड पथक ढोलताशे बुकिग सजावटीसाठी सरसावले असून मुर्तीकरही बाप्पांच्या मुर्तीवर अखेरचा हात फिरवत आहे
गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल
पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरा केला जातो त्यानुसार गणपती उत्सवाला 14 सप्टेंबर (सोमवार) पासून सुरुवात होणार असली तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गणपती बाप्पा 19 दिवस उशिरा विराजमान होतील यादिवशी गणेशाची  पूजा केली जाईल तर गौरी गणपती विसर्जन हे 19 सप्टेंबर 2026 रोजी होणार तर गणपती विसर्जन (अनंत चतुर्दशी 25 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे म्हणजेच 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 दरम्यान गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे त्यानतर 12 व्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे यावर्षा बाप्पांची मुर्ती बनविण्याची लगबग  अखेरच्या टप्प्यात असून त्यामुळे मुर्ती कारागिरांनाही आधिक वेळ मिळाला आहे मागील वर्षी 27 ऑगस्टला गणेश उत्सवाला सुरुवात झाली होती तर 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती  यावर्षा माञ बारा दिवस गणारायाचा मुक्काम राहणार असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षा बाप्पांचे 19 दिवस उशिरा आगमन होणार असले तरी आतापासूनच मुर्तिकार गणपती मंडळे तयारीला लागले असून मुर्तिची बुकिग होऊन पोहोच केली जात आहे बाहेरील राज्यातील मुर्तिकार मुर्ती बनविण्यासाठी महाराष्ट्रात आल्याने स्थनिक कारागिरांना त्याचा फटका बसत आहे गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्ताला बुध्दी समृद्धी व सौभाग्य प्रप्त होते असे मानले जाते गणेश  चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सव सुरु होतो हा उत्सव 10,,12 दिवस चालतो या उत्सवात गणेशाची विधिवत पूजा केल्यास शुभफल प्राप्त होते देशभर गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो यात काही दिवसातच गणेश मंडळात सजावटीचे लगबग सुरु होणार आहे गणेशभक्त 11,12 दिवस गणपती बाप्पाची आरती भजन किर्तनात दगून जाण्यास सज्ज झाले आहेत गणेशाची भक्तीभवाने पूजा करण्यास उत्सुक आहेत
Previous Post Next Post