लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात..चान्नी ठाण्यात ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले..

लाचखोर उपनिरीक्षक महादेव देशमुख एसीबीच्या जाळ्यात

चान्नी ठाण्यात ३५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

(पातुर तालुका प्रतिनिधी दूल्हेखान युसुफ खान)


 पातूर:  तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोला व वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ ऑगस्ट रोजी संयुक्त कारवाईत रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तक्रार दार यांच्या बिअर शॉपीला वाईन बारचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ना-हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात उपनिरीक्षक महादेव देशमुख यांनी ६५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.तडजोडीनंतर ३५ हजार रुपये देण्याचे ठरले.
त्यानुसार तक्रार दार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.ठरल्याप्रमाणे १८ ऑगस्ट रोजी चान्नी पोलीस ठाण्यात ३५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
Previous Post Next Post