*अजंदे गावचा मोहित बिरपण यांची डायल ११२ सेवेत निवड; तालुक्यात शुभेच्छांचा वर्षाव*

 *अजंदे गावचा मोहित बिरपण यांची डायल ११२ सेवेत निवड; तालुक्यात शुभेच्छांचा वर्षाव* 



( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )

रावेर : रावेर तालुक्यातील अजंदे गावचे रहिवासी मोहित बिरपण यांची डायल ११२ सेवेत नियुक्ती झाल्याने अजंदे गावासह संपूर्ण रावेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच ग्रामस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
डायल ११२ ही आपत्कालीन मदत सेवा असून, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी या सेवेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या सेवेत मोहित बिरपण यांची नियुक्ती झाल्याने अजंदे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मोहित बिरपण यांच्या नियुक्तीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढील सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या कार्यकाळात नागरिकांना तत्पर व उत्कृष्ट सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
अजंदे गावातून डायल ११२ सेवेत निवड झाल्याबद्दल मोहित बिरपण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Previous Post Next Post