फैजपूर सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस, जनतेचे रक्षक गेले कुठे ? महामार्गाच्या चौकात एकही पोलीस नाही?
फैजपुरातील छत्री चौक ,बनानासिटी सावदा चौकात अपघात होण्याची दाट शक्यता?
(मुख्य संपादक हमीद तडवी जळगाव)
यावल रावेर तालुक्यातील फैजपूर सावदा शहरातील अंकलेश्वर महामार्गावर असलेले चौक तसेच समृद्धी महामार्गाला जोडणारे छत्री चौक ,बनानासिटी चौक हे दिवसेंदिवस अपघातांचा सापळा बनत चालले असल्याचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे याकडे मात्र फैजपुर,सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि नगरपरिषद च्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची यावल.रावेर तालुक्यात जोरदार चर्चा सूरू आहे .रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता भासू लागली आहे यातच शेजारी असलेल्या दुकानदारांनी देखील अतिक्रमण केल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे सावदा फैजपूर हे दोन्ही तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने तसेच प्रांत कार्यालय,जिल्ह्याचे फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे कार्यालय ह्या फैजपूर शहरात असल्याने या फैजपूर शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची नागरिकांची ये जा सुरु असते तसेच या परिसरात जनतेची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते त्यातच तीनचाकी रिक्षा वाले आपले पेसेंजर मिळवण्यासाठी जसे काही रेसच्या मैदानात वाहन चालवण्याचे दिसुन येत आहे. त्याचबरोबर भारतात सुप्रसिद्ध असेलेले सावदा फैजपूर रोडवरील ट्रानसपोर्टच्या ठिकाणी देखील मोठ्या वाहनांची वर्दळ असते या वाहनांची वर्दळीत तीन चाकी रिक्षा वाले त्यांचे प्रवाशी मिळवण्यासाठी कसेबसे धावपळीत वाहन चालवुन अपघातांना निमंत्रण देण्याचे काम करीत आहेत याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे. आणि आमचे एखाद्याचे मूडदे पाडल्यावरच पोलीसांना जाग येईल का ?असाही सवाल परिसरातील जनतेने उपस्थित केला आहे तरी अशा ह्या वर्दळीपासुन अपघात होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करुन बेजबाबदार वाहतुकीला आळा बसवावा.अशी जनतेची मागणी जोर धरत आहे.तरी या संपूर्ण प्रकाराकडे नवनिर्वाचित आलेले सहायक पोलिस निरीक्षक साहेबांनी लक्ष घालण्याची गरज आहे.आणि आडवे तिडवे वाहन लावुन इकडे तिकडे वाहन चालवणाऱ्या तिनचाकी वाल्यांकडे जास्त लक्ष देण्याची परिसरातील जनतेची मागणी सध्या जोर धरू लागली आहे तीनचाकी रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे
परिसरातील जनतेची नागरिकांची डोकेदुखी वाढली असल्याने रिक्षा चालक वेगेवर नियंत्रण न ठेवता वाहन चालवत आहे अशा बेजबाबदार तीन चाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई ची मागणी परिसरातील जनतेने केली आहे..

