जागतिक आदिवासी दिनानिमित्त परसाडे येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप
आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा स्तुत्य उपक्रम; देणगीदारांचे मान्यवरांकडून आभार
यावल | प्रतिनिधी : फिरोज तडवी
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने जागतिक आदिवासी दिन २०२६ निमित्त परसाडे बु. येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या वतीने शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला समाजबांधव, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहकार्य केले.
आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा सुरू असताना गफूर अरमान तडवी यांनी दप्तर वाटपाचा प्रस्ताव मांडला. त्यास खलील छब्बीर तडवी यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर समाजबांधवांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या समाजबांधवांनी आर्थिक मदत करून या उपक्रमाला हातभार लावला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हमीद तडवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. नवीन दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
कार्यक्रमास मुख्याध्यापक सौ. उज्वला सोनार, उपशिक्षिका सौ. कल्पना माळी, सौ. हसीना तडवी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हमीद अकबर तडवी तसेच प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख मोहम्मद हबीब तडवी उपस्थित होते. सरपंच मीना तडवी, पोलीस पाटील, सरवर तडवी, छब्बीर तडवी, उखर्डू तडवी, कुर्बान तडवी, समीर तडवी यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देणगीदारांचे मान्यवरांकडून आभार
या उपक्रमासाठी शकील तडवी, रशीद तडवी – महावितरण भुसावळ, जावेद तडवी – शालेय समिती उपाध्यक्ष, रियाज तडवी – यावल, कुरबान तडवी – महावितरण यावल, कुरबान तडवी – जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, हुसेन तडवी – रि.ऑ. फॅक्टरी, मोसिम तडवी – सूतगिरणी यावल, सद्दाम तडवी – सेतू केंद्र यावल, शब्बीर तडवी – रेल्वे वर्कशॉप मुंबई, सलीम तडवी – इंडियन नेव्ही मुंबई, अझरुद्दिन तडवी – इंडियन आर्मी, हमीद तडवी, म. उस्मान तडवी – इसाले सवाब परसाडे, सलीम तडवी – महावितरण यावल, सईदा तडवी – मुंबई पोलीस, मजित तडवी – ग्रामसेवक, अजित तडवी – क्लर्क मुंबई, मकबूल तडवी – BOI मुंबई, लुकमान तडवी – पोल्ट्री फार्म नाशिक, जावेद तडवी – मुंबई, माया तडवी – मुंबई, मूनाफ तडवी – जळगाव, अमित तडवी – इंडियन रेल्वे मुंबई, अशरफ तडवी – सूतगिरणी यावल, खलील तडवी, राजू तडवी – ठाणे, बबलू तडवी – जळगाव, अब्दुल तडवी – वनविभाग, साहिल तडवी, मुकद्दर तडवी – मंत्रालय मुंबई, संजय तडवी – सावदा पोलीस, समीर तडवी – ठाणे शहर पोलीस, जावेद तडवी – जळगाव, ॲड. आबिद तडवी – डहाणू, असलम तडवी – सेतू केंद्र यावल, यासिन तडवी – RTI पत्रकार यावल, यासिन तडवी – पिंपरी सरपंच, जावेद तडवी – यावल, फारुख तडवी – हॉस्पिटल यावल, समीर तडवी – हरिपूरा वनविभाग, फिरोज तडवी – चिकन सेंटर, हमीद तडवी – रिटायर PWD यांच्यासह सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
काहींनी व्यक्त केले मनोगत
यावेळी उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी मनोगत व्यक्त करताना, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. शालेय साहित्य वाटपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळते आणि समाजातील एकोपा व सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत होते, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुर्बान तडवी, समीर तडवी, मोसीम तडवी, जहाँबीर तडवी, अलाउद्दीन तडवी, अशरफ तडवी, सिराजुन तडवी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणारा आणि समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम परसाडे बु. येथे कौतुकाचा विषय ठरला.

