तंबाखूच्या दुष्परिणामांवर प्रहार! ऐनपूरच्या शाळेत विशेष अभियान* विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ!

*तंबाखूच्या दुष्परिणामांवर प्रहार! ऐनपूरच्या शाळेत विशेष अभियान* 
  विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ!

(जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे रावेर)

 ऐनपूर (ता. रावेर):येथील सरदार वल्लभभाई पटेल पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू व इतर अंमली पदार्थांच्या घातक दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्यासाठी ‘तंबाखूमुक्त शाळा अभियान’ उत्साहात राबविण्यात आले.या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, सिगारेट यांसारख्या व्यसनांमुळे शरीरावर आणि मनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची सविस्तर माहिती देण्यात आली. "विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच व्यसनांपासून दूर राहून निरोगी व आनंदी जीवनशैलीचा अंगीकार करावा," असे आवाहन मुख्याध्यापक अक्षय पाटील यांनी यावेळी केले.शाळेचे व्यवस्थापक आर. टी. महाजन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छ सवयी, उत्तम आरोग्य आणि सुदृढ जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः तंबाखू व कोणत्याही व्यसनांच्या आहारी न जाण्याची, तसेच तंबाखूमुक्त समाज घडवण्यासाठी सक्रिय योगदान देण्याची सामूहिक शपथ घेतली.कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण झाली असून, ‘तंबाखूमुक्त शाळा आणि तंबाखूमुक्त समाज’ निर्मितीचा एक सकारात्मक संदेश परिसरात गेला आहे.
Previous Post Next Post