कु. अनाया हावरे हिच्या वाढदिवसानिमित्त आजोबा राजीव हावरे यांच्याकडुन.श्री जगदंबा हायस्कूल, उरुलच्या दहावीच्या विद्यार्थीनीना १२ सायकलींचे वाटप
(सातारा जिल्हा प्रतिनिधी शशिकांत माथने)
मल्हारपेठ ता
सातारचे ज्येष्ठ उद्योगपती मा. श्री. राजीव हावरे साहेब यांनी आपल्या नातीचा (कु. अनाया निकिष हावरे हिचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत स्तुत्य उपक्रमाने साजरा केला. या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री जगदंबा हायस्कूल, उरूल या विद्यालयातील विद्यार्थिनीना तब्बल १२ सायकली भेट म्हणून देण्यात आल्या. व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.
या उपक्रमामुळे दूरवरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ कमी होऊन वेळेत शाळेत येऊन अभ्यासाला वेळ मिळणार आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच यावर्षीपासून इयत्ता १० वी च्या निकालात ९०% च्या पुढील विद्यार्थ्यांना रोख रुपये १०, हजार रुपयेही बक्षीसरुपाने देण्यात आले.
दरम्याण सायकल वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी श्री जगदंबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल निकम, सेक्रेटरी श्री. संजय साळुंखे, संचालक श्री. जगन्नाथ माने, मुख्याध्यापक श्री. राजेंद्र माने सर, श्री. सोपान लोहार तसेच पाटण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष श्री. अमीर मुलाणी उपस्थित होते.
यावेळी श्री राजीव हावरे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. संस्थेचे संचालक श्री जगन्नाथ माने व शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र माने यांनी श्री राजीव हावरे यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मा. श्री. राजीव हावरे साहेब यांच्या या सामाजिक दातृत्वाचे कौतुक करत त्यांचे व हावरे कुटुंबाचे मनःपूर्वक आभार मानले. कु. अनाया हिला विद्यालयाच्या वतीने वाढदिवसाच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
उरुल- येथील शालेय विद्यार्थीनिना सायकल वाटप प्रसंगी उद्योगपती राजीव हावरे साहेब समवेत मान्यवर उपस्थित होते

