अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात फुलझाड लागवड उपक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनीचा सहभाग
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :बिलोली तालुक्यातील अटकळी येथील किशोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेचा परिसर आकर्षक, निसर्गरम्य व पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून फुलझाड लागवड उपक्रम राबविण्यात आला.
प्राचार्य राजेश्वर अटकळे यांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रत्येकाने एक फुलझाड शाळेत आणले. या उपक्रमातून जास्वंद १७, स्वस्तिक २०, गुलाब १३, गणेशवेल ७ तसेच इतर विविध प्रकारची फुलझाडे मिळून एकूण ७२ फुलझाडांची शाळेच्या परिसरात लागवड करण्यात आली.यावेळी प्राचार्य राजेश्वर अटकळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असून, पुढील टप्प्यात शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
या प्रसंगी सहशिक्षक गंगाराम दोनतुलवाड, भालचंद्र गायाकवाड, संभाजी पाटील गव्हाणे, विजयकुमार कचवे, मारुती हिमगिरे, सौ. रंजना मुरगे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

