ऐन श्रावणात तेल साखर गुळाला महागाईचे ग्रहण..सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा तडाखा सामान्यांच्या संसाराचे बजेट कोलमडले अच्छे दिन चा सवाल..

ऐन श्रावणात तेल साखर गुळाला महागाईचे ग्रहण
सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचा तडाखा सामान्यांच्या संसाराचे बजेट कोलमडले अच्छे दिन चा सवाल


(अहिल्या नगर/प्रशांत बाफना विभागीय संपादक)


 श्रावण महिना सुरू होताच घराघरात सण उत्सवाची लगबग वाढली माञ या आनंदावर महागाईने विरजण घातले आहे खाद्यतेल साखर गुळ तांदूळ साबुदाणा आणि भगर या रोजच्या वापरातील तसेच उपवासासाठी आवश्यक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील गणित पुरते बिघडले आहे साखर गुळाच्या दरवाढीने चहाचा गोडवा कमी झाला तेलाच्या वाढलेल्या भावाने स्वयंपाकाचे बजेट बिघडले तर तांदळाच्या दरवाढीने रोजच्या जेवणाचा खर्च वाढला आहे त्यातच श्रावणातील उपवासासाठी लागणारा साबुदाणा आणि भगरही महागल्याने उपवास करणेही सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणारे ठरत आहे मर्यादित उत्पन्नात वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालताना गृहिणींची अक्षरशः दमछाक होत आहे महागाईचा हा तडाखा केवळ बाजारपेठेपुरता मर्यादित राहिलेला नसून तो थेट सर्वसामान्यांच्या ताटापर्यत पोहोचला आहे  सणासुदीला घरात गोडधोड करायचे देवाला नैवेद्य दाखवायचा आणि पाहुण्यांचे स्वागत करायचे पण वाढलेल्या दरामुळे प्रत्येक घासाचेही बजेट आखावे लागत आहे तेल साखर गूळ तांदूळ साबुदाणा आणि भगरच्या वाढलेल्या किमतीनी सामान्यांच्या खिशाला कात्री लावली असताना राजकारण माञ आरोप प्रत्यारोपात रंगले  आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय धुराळा उडत असताना महागाईच्या चटक्यांनी होरपळणाऱ्या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देणार कोण?सण आनंदाचा असतो पण महागाईने त्या आनंदालाच ग्रहण लावले तर अच्छे दिन नेमके कुणाच्या दारी आले असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत दरम्यान खाद्यतेल पूर्वी १२० रुपये आता १७०रुपयेला पिशवी साखर ४२ रु आता ६५रुपये प्रतिकिलो गुळ ४२ रुपये आता ६५रुपये प्रतिकिलो साबुदाणा ७० रुपये आता १०० रुपये प्रतिकिलो भगर १०० रुपये आता २४० रुपये प्रतिकिलो तांदूळ ४५ रुपये आता ७० रुपये प्रतिकिलो सध्या इतर काही जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर असून ज्वारी माञ भडकली आहे 
चौकट 
महागाईच्या चटक्यात अच्छे दिन कुठे हरवले?
सणासुदीच्या दिवसांत जनतेच्या ताटात आनंद वाढायला हवा माञ तेल साखर गूळ तांदूळ साबुदाणा आणि भगरच्या वाढत्या दरांनी ताटातील घासच महाग केला आहे हातावर पोट असणाऱ्यांनी सण साजरा करायचा तरी कसा ?भाषणात विकासाचे गोडवे गाणाऱ्या सरकारने एकदा सामान्यांच्या स्वयंपाकघरात डोकावून पाहावे तिथे आकडे नाहीत तर रिकाम्या डब्यांचा आवाज आहे महागाईवर घोषणा नकोत जनतेला दिलासा देणारी ठोस कृती दाखवून दिली पाहिजे 
चौकट 
एकीकडे महागाई वाढली पण पगार तेवढाच
एकीकडे महागाई भरमसाठ वाढत असताना ज्याचे हातावर पोट आहे त्यानी काय करावे ठिकठिकाणी काम करणारे कामगारांना बारा हजार पगार दिला जातो या पगारावर घरभाडे दूधबील किराणा सामान लाईट बील फोनचे रिचार्ज दवाखाना भाजीपाला आदी कसे भागायचे हा प्रश्न कामगारापुढे पडत आहे कमी पगाराबाबत  कोणी आवाज उठवत नाही असा सवाल कामगारांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला आहे
Previous Post Next Post