केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकारी बँकिंग क्षेत्रातील विविध डिजिटल सेवांचे उदघाटन करण्यात आले.
मुंबई जिल्हा प्रतिनिधी
✅ एसओसी (सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर) आणि बंडल्ड सेवांचा शुभारंभ
हे अत्याधुनिक केंद्र शहरी सहकारी बँकांना सायबर हल्ले आणि ऑनलाइन फसवणुकीसारख्या धोक्यांवर सातत्याने देखरेख ठेवण्यास, त्यांची वेळीच ओळख पटविण्यास आणि तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यास मदत करेल.
✅ राष्ट्रव्यापी सेवा बंडलअंतर्गत कोअर बँकिंग सेवा तसेच त्यांच्याशी संबंधित सेवांचा शुभारंभ
कोअर बँकिंग, मोबाईल व इंटरनेट बँकिंग, यूपीआय-आयएमपीएस पेमेंट, सायबर सुरक्षा, व्हॉट्सॲप चॅटबॉट, अनुपालन, सॉव्हरिन क्लाउड, एईपीएस आणि डीबीटी (Aadhaar Enabled Payment System and Direct Benefit Transfer) अशा विविध सेवांचे एकाच प्लॅटफॉर्मवरून सुलभ, सुरक्षित आणि प्रभावी व्यवस्थापन शक्य होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री जयकुमार रावल, राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता व इतर मान्यवर उपस्थित होते.

