*एम.आय.डी.सी. परिसरात चाकु चा धाक दाखवुन जबरी चोरी करणा-या आरोपीतांना अटक तीन गुन्हे उकल..."*

*एम.आय.डी.सी. परिसरात चाकु चा धाक दाखवुन जबरी चोरी करणा-या आरोपीतांना अटक तीन गुन्हे उकल..."*

(मीडिया पोलिस टाईम अकोला जिला संपादक इमरान खान)

अकोला:पोलीस स्टेशन एमआयडीसी हद्दीतील राहणारे प्रेम दीपक कोल्हे वय १८ वर्ष रा. भाम्बेरी जि अकोला यांनी दि१९.०७.२०२६ रोजी रात्री ०९.३० वा दरम्यान मारोती पेवर्स एमआयडीसी क्र ०४ अकोला येथे रोड वर फिरत असतांना एक मोटार सायकल वर बसुन तिन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना मारहाण करुन वाक् वा धाक दाखवुन फिर्यादी कडील एक रीअलमी कंपणीचा मोबाइल किंमत अंदाजे १५०००/- रू. व फिर्यादी चा मित्र अर्जुन लाल बेठेकर याचे कडुन एक मोबाइल किंमत अंदाजे २०००/- रू चा जबरदस्तीने हिसकावुन घेतला तसेच दिलीप सिताराम माहुरे वय ५७ वर्षे रा. राहुल सिद्धस, एम.आय.डी. सी. क. ४ अकोला यांना नारायण दालमिल जवळ चाकु चा धाक दाखवुन मारहाण करुन त्यांचे जवळून नगढी १७००/- रु. असा एकुण १८७००/- रु. चा मुददेमाल जबरदस्तीने हिसकावुन घेतल्यावरुन पोरटे ला अप.नं. ३६२/२०२६ कलम ३०९ (४), १२६ (२), ३५१ (२), ३(५) बी.एन.एस. चा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

एम.आय.डी.सी. अकोला येथील दि. फिर्यादी लक्ष्मण चव्हाण यांना चाकु चा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचे कडून एक रिअलमी कंपणीचा मोबाईल व नगदी ५००/- रु. पैसे हिसकावून नेल्याने अप नं. ३४५/२०२६ कलम ३०९ (४), ३(५) भा. न्या. सं. प्रमाणे दाखल आहे. पोरटे एम.आय.डी.सी. अकोला येथे दि. २७/०५/२०२६ रोजी फिर्यादी गजानन महादेव भटकर यांना चाकु चा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचे कडून नगदी ४,०००/- रु. हिसकावून घेतल्याने अप नं. ३२४/२०२६ कलम ३०९ (४), ३(५) भा. न्या. सं. प्रमाणे दाखल आहे.

सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे आकाश उर्फ करण विनोद थुकेकर, यश उर्फ राम संतोष नवले, अभिजित उर्फ अभि विश्वनाथ वैरागळे, पुजा दिनेश वानखडे सर्व रा. कृषी नगर, अकोला यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपीतांनी अप नं. ३६२/२०२६, अप.नं. ३४५/२०२६ आणि अप नं. ३२४/२०२६ कलम ३०९ (४), ३ (५) भा.न्या.सं. मधील फिर्यादी यांना चाकु चा धाक दाखवुन त्यांचे कडुन मोबाईल व नगदी पैसे घेतल्याची कबुली दिल्याने आरोपीतांकडून एक पल्सर मोटार सायकल, एक सुझुकी एक्सीस मोटार सायकल, एक लोखंडी चाकु, एक रियलमी कंपणीचा रियल मी कंपनीचा मोबाइल व ३३०० रु नगदी असा एकूण २४१०० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला

सदर कारवाई मा. श्री. अर्चित चांडक साहेब, पोलीस अधिक्षक अकोला, मा.श्री. बी. चंद्रकांत रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक साहेब, मा.श्री. सुदर्शन पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकोला यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि विजय जाधव, ठाणेदार पोस्टे. एम.आय.डी.सी, पोउपनि देवीदास फुलउंबरकर, पोहेकॉ विजय अंभोरे, पोहेकॉ सतिश प्रधान, पोकॉ निलेश वाकोडे, पोकॉ अथर खान यांनी सदर गुन्हे उघडकीस आणले आहेत.
Previous Post Next Post