📢 दुकानदारांच्या थापांना बळी पडू नका! MAHA ID बाबत ही माहिती नक्की वाचा!
आजकाल ऑनलाईन काम करणारे काही व्यावसायिक 'Maha ID' बद्दल गैरसमज पसरवून नागरिकांची लूट करत असल्याचे समोर येत आहे.
Maha ID बाबत खालील गोष्टी नीट समजून घ्या:
(मुख्य संपादक हमीद तडवी जळगाव)
Maha ID म्हणजे काय? *Maha ID* हे राज्यातील सर्व शासकीय योजनांचे एक मध्यवर्ती पोर्टल आहे. तुम्ही आजपर्यंत शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे, त्याची सर्व माहिती या एकाच पोर्टलवर एकत्रित दिसेल.
लाडकी बहीण योजनेशी Maha ID चा संबंध आहे का?
नाही! 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे KYC आणि Maha ID कार्ड यांचा काहीही संबंध नाही.
Maha ID चा खरा उपयोग:
Maha ID काढल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणे किंवा अडकणे असे काहीही होत नाही. उलट, तुम्ही घेतलेला लाभ फक्त या पोर्टलवर नोंदवला जातो.
⚠️ महत्त्वाची सावधानता:
काही ऑनलाईन केंद्र आणि दुकानदार "लाडकी बहीण योजनेसाठी Maha ID कार्ड अनिवार्य आहे" असं खोटं सांगून नागरिकांकडून २०० ते ३०० रुपये उकळत आहेत. अशा अफवांना आणि फसवणुकीला अजिबात बळी पडू नका!

