आरक्षण उपवर्गीकरणासाठी नांदेड मध्ये दि 10 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर महासत्याग्रह आंदोलन..
मातंग समाज मोठया संख्येने उपस्थित राहावे -लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र ..
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : लोकस्वराज आंदोलन महाराष्ट्र राज्य आयोजित आरक्षण वर्गीकरण करणेविषयी,पदयात्रा महासत्याग्रह आंदोलन दिनांक, 10 सप्टेंबर 2026 ते 15 सप्टेंबर 2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे, तरी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मातंग समाज व वंचित जात समूह उपस्थित रहावे असे लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आव्हान करण्यात आले आहे, १ ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने साथ सदस्य खंडपीठाने आरक्षणात वर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार दिले असल्याचे घोषणा केली आहे, मात्र महाराष्ट्र सरकारने उपवर्गीकरण करण्यासाठी वेळ काढू पणा करत असल्याच लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ. रामचंद्र भरांडे यांनी केली म्हटले आहे
यासाठी, दिनांक 10 सप्टेंबर 2026 ते 15 सप्टेंबर 2026 पर्यंत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे महासत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे या,आंदोलनाचे नेतृत्व एकनाथ रेडे सामाजिक कार्यकर्ते लोकस्वराज आंदोलन महाराष्ट्र, व गोविंद रेडे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्हा लोकस्वराज आंदोलन नांदेड यांनी करत आहेत
मौजे कापशी खू येथून दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी, पदयात्रा निघेल जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड पर्यंत पदयात्रा निघणारा असून पदयात्रा कापसी,मारतळा, काकांडी, जवाहर नगर,चंदा सिंग कॉर्नर, वाजेगाव, देगलूर नाका, रेल्वे स्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड पर्यंत, व दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत महासत्याग्रह आंदोलन तरी सर्व मातंग समाज व लाभ वंचित समूहाने उपस्थित राहण्याच, लोकस्वराज आंदोलन नांदेड जिल्हा कडून करण्यात आले आहे.

