कोरपावलीत ईद-ए-मिलाद निमित्त छोटेखानी कार्यक्रम उत्साहात..
जळगावचे करीम सालार हाजी मजीद जकरिया यांची विशेष उपस्थिती; लंगराचे आयोजन..
कोरपावली | प्रतिनिधी : फिरोज तडवी
यावल तालुक्यातील कोरपावली येथे ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त छोटेखानी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जळगाव येथील मान्यवर पाहुणे करीम सालार हाजी मजीद जकरिया यांची विशेष उपस्थिती लाभली.
ईद-ए-मिलादच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी लंगराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी राजू शाह, बबलू तडवी, सलीम भाई मंडावले, सत्तर तडवी, फिरोज तडवी, मुकद्दर तडवी, राजू तडवी, अशरफ तडवी, सिकंदर तडवी, सुपडू तडवी, रसूल तडवी, अयूब तडवी, अजीत तडवी, हुसैन तडवी, रहमान तडवी, अल्ताफ तडवी, जावेद तडवी, सलीम तडवी यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरपावली गावात ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे धार्मिक वातावरणात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

