…तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद : जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

…तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद : जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

(आंतरवली सराटी । प्रशांत बाफना विभागीय संपादक)

मराठ्यांची ही शेवटची लढाई आहे, त्यानुसार प्रत्येकाने तयारी करा. 12 सप्टेंबरला बांदा ते चांदा अशा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांनी कोणतेही कारण न देता आंतरवाली सराटीत बैठकीसाठी उपस्थित राहा, असे थेट आणि आक्रमक आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. सरकार मराठ्यांची फसवणूक करत असून, 12 तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवून सरकारचा माज उतरवण्यासाठी सर्वांनी मुंबईकडे निघायचे आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईतील आंदोलनादरम्यान जर कोणत्याही एका मराठा आंदोलकाचे डोके फुटले किंवा प्रशासनाने अन्याय केला, तर 10 मिनिटांत संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडला जाईल. तसेच मुंबईकडे जात असताना जर सरकारने आंदोलकांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, तर आपापल्या शहरातून जाणारे रस्ते आणि रेल्वे पूर्णपणे बंद पाडण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकार मराठा समाजाची अडवणूक आणि वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत जरांगे यांनी मराठा समाजाला निर्णायक संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.राज्य सरकारवर निशाणा साधताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून प्रचंड निष्काळजीपणा सुरू आहे. हे केवळ शिंदे आणि फडणवीस यांची मिळीभगत असून ते मराठ्यांना फसवण्याचे काम करत आहेत. पोलिसांचा यात काहीही दोष नाही, सर्व दोष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे. सरकारच्या या धोरणामुळे मराठा समाजात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

शांततेत आंदोलन
जर सरकारने मुंबईत जाण्याची परवानगी दिली, तर पूर्णपणे शांततेच्या मार्गाने मुंबईत प्रवेश केला जाईल. पोलिसांनी त्रास दिला तरी त्यांना उलट त्रास द्यायचा नाही. पोलिसांनी अचानक हल्ला केला तर कोणीही घाबरून पळू नये, ज्यामुळे चेंगराचेंगरी होणार नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. सध्या कोणीही आंतरवालीत गर्दी करू नये. सर्वांनी 12 सप्टेंबरला बैठकीसाठी आंतरवाली सराटीत उपस्थित राहावे. हातातली सर्व कामे बाजूला ठेवून 12 तारखेला आंतरवालीत या. तिथेच मुंबई कूचची अंतिम तारीख आणि पुढची रणनीती ठरवली जाईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.



सरकारचा मोठा निर्णय! मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी ४ GR जारी
मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या आंदोलनाचा १० वा दिवस आहे. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा, कुणबी आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारकडून एकाच वेळी ४ GR जारी करण्यात आले असून, या निर्णयांचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. सरकारने मराठा विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती, वसतिगृह भत्त्यासाठी निधी, परदेशी शिष्यवृत्ती धोरण, तरुणांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण असे निर्णय घेतले आहेत.

मराठा विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती
तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) राज्यातील सर्व विभागीय कार्यालये आणि विद्यापीठांना निर्देश दिले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक सवलती आणि उपलब्ध सोयी-सुविधांचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटींचा निधी
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटींचा निधी EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला हा निधी संबंधित विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.

सारथी परदेशी शिष्यवृत्ती धोरण
सारथीमार्फत दिल्या जाणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या धोरणातही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता परदेशी विद्यापीठांची शिक्षण फी थेट संस्थेला अदा केली जाणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या रकमेवरील कमाल मर्यादा हटवण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना दरवर्षी १५०० अमेरिकन डॉलर, तर यूकेमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना ११०० जीबीपी अतिरिक्त निर्वाह किंवा आकस्मिक भत्ता मिळणार आहे. शिष्यवृत्तीसाठी QS Ranking वर आधारित नवीन गुणवत्ता यादी पद्धतीही लागू करण्यात आली आहे.



१,४४० तरुणांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण
सारथी संस्थेने IDTRS पिंपरी-चिंचवडसोबत सामंजस्य करार करून १,४४० मराठा आणि कुणबी तरुणांसाठी LMV, HMV ड्रायव्हिंग तसेच कंडक्टर प्रशिक्षणाचा कार्यारंभ आदेश जारी केला आहे. हे प्रशिक्षण १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. प्रशिक्षणानंतर किमान १,००० लाभार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्याची अटही ठेवण्यात आली आहे. सरकारच्या या चार निर्णयांमुळे मराठा, कुणबी आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे
Previous Post Next Post