भरदिवसा १० क्विंटल लोखंडी सळई लंपास ; ७१ हजारांचा माल चोरट्यांच्या हाती ,यावल पोलिसात गुन्हा दाखल - तपासाला वेग

भरदिवसा १० क्विंटल लोखंडी सळई लंपास ; ७१ हजारांचा माल चोरट्यांच्या हाती ,
यावल पोलिसात गुन्हा दाखल - तपासाला वेग


(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि ९ 
यावल तालुक्यातील सांगवी बु. गावात भरदिवसा अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी केली आहे. पाण्याच्या हौदाजवळ उभ्या असलेल्या मालवाहू वाहनातून तब्बल १० क्विंटल लोखंडी सळई लंपास करण्यात आली असून याची किंमत ७१ हजार रुपये आहे.या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यावल येथील विरारनगर येथील रहिवासी अनिस अय्यूब पटेल ( वय ) ४५ यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते MH-19-BM-3584 या मालवाहू वाहनावर चालक आहेत. दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी विश्वास ट्रेडर्सचे मालक अभय जंगले यांनी १० क्विंटल सळई सांगवी बु. येथील पाण्याच्या टाकीजवळ पोहोचवण्यास सांगितले होते.

पटेल हे दुपारी १.१५ वाजता सांगवी बु.येथे माल घेऊन पोहोचले.पोट दुखत असल्याने त्यांनी वाहन लॉक करून लघुशंकेसाठी गेले.१.४५ वाजता परत आल्यावर वाहनातील १० क्विंटल माल गायब असल्याचे निदर्शनास आले.

चोरीस गेलेला मुद्देमाल १२ MM - ३०० किलो (१८ हजार), १० MM - ३०० किलो (२१ हजार), ०६ MM - ४०० किलो (३२ हजार) असा एकूण ७१,००० रुपयांचा आहे.

या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३२९/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र बागुल करीत आहेत.
Previous Post Next Post