शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला, महिला तलाठी गजाआड
(अहिल्यानगर। प्रशांत बाफना विभागीय संपादक)
शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या मदत व सानुग्रह वाटप अनुदानात नियमबाह्य कामकाज करून शासनाच्या लाखो रुपयांची अफरातफर करणाऱ्या राहुरी तालुक्यातील एका महिला तलाठीला राहुरी पोलीस पथकाने ताब्यात घेऊन गजाआड केले.
मंडल अधिकारी विजय बेरड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात एप्रिल 2026 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तलाठी मंगल रूपचंद गुसिंगे ही राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाशी संबंधित अनुदान वाटपामध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारीवरून चौकशी समिती नेमण्यात आली होती.
चौकशी अहवालानुसार सन 2022 ते 2023 या कालावधीमध्ये तलाठी मंगल गुसिंगे हिने नियमबाह्य पद्धतीने एकूण 3 लाख 65 हजार 340 रुपयांचे अनुदान वितरित केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामध्ये शासनाची फसवणूक, विश्वासघात, आर्थिक नुकसान आदी गंभीर स्वरूपाचे आरोप निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे संबंधित तलाठी मंगल गुसिंगे हिच्या विरोधात विविध कलमा अंतर्गत अपहार केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच तलाठी गुसिंगे हिने जालना जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून तिथे 12 लाख 24 हजार 802 रुपयांचा अपहार केल्याची माहिती मिळाली. गेल्या सहा महिन्यांपासून तलाठी मंगल गुसिंगे हि फरार होती. दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी राहुरी पोलिस पथकाने ताब्यात घेऊन गजाआड

