आ .कर्डिलेंचा जनता दरबार नागरिकांचे व्यासपीठ..घरगुती वादापासून प्रशासकीय प्रश्नांची केली जाते सोडवणूक..

आ .कर्डिलेंचा जनता दरबार नागरिकांचे व्यासपीठ
घरगुती वादापासून प्रशासकीय प्रश्नांची केली जाते सोडवणूक..


(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


रस्ते ,पाणी शासकीय कामे आशा सार्वजनिक प्रश्न बरोबरच घरगुती वाद भावकीतील वाद कौटुंबिक समस्या आणि प्रशासकीय पातळीवरील अडचणी घेऊन नागरिक थेट आमदार अक्षय कर्डिले यांच्या जनता दरबरात पोहोचत आहे नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या हाताळण्याच्या पद्धतीमुळे हा जनता दरबार नागरिकांसाठी आपले हक्काचे व्यासपीठ ठरत आहे .
स्व .आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनता दरबाराची पद्धत सुरू केली होती त्यांच्या निधनानंतर हा उपक्रम पुढे नेण्याचे काम आमदार अक्षय कर्डिले करत आहे जनता दरबाराच्या माध्यमातून मतदार संघातील विकास कामे आणि स्थानिक प्रश्न संदर्भात प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे जनता दरबारात केवळ पायाभूत सुविधांचे प्रश्नच मांडले जात नाही तर एखाद्या कुटुंबातील वाद भावकीतील मतभेद जमिनीशी संबंधित तक्रारी शासकीय कार्यालयातील प्रलंबित कामे पाणीपुरवठा वीज रस्ते घरकुल महसूल अथवा इतर प्रशासकीय अडचणी घेऊन नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे मतदारसंघातील नागरिकांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा जनता दरबारातील उद्देश असल्याचे आमदार अक्षय कर्डिले यांचे समर्थक सांगत आहेत .
स्व .शिवाजीराव कर्डिले यांच्या राजकीय वाटचालीतून नागरिकांशी थेट संवाद साधण्याची पद्धत आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडून आली आहे त्यामुळे मतदारसंघाच्या विकास कामासाठी मोठा निधी आणण्यासाठी आमदार अक्षय कर्डिले हे नक्कीच यशस्वी होत असल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे .
Previous Post Next Post