राहुरी नगरपरिषदेच्या उपनगर अध्यक्ष पदाचा श्री .गजानन सात भाई यांचा राजीनामा..
(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )
अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री .गजानन सातभाई यांनी आपल्या राहुरी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाचा अचानक नगरपरिषदेच्या प्रशासनाकडे राजीनामा सादर केल्यामुळे श्री .गजानन सातभाई यांच्या राजीनाम्यामुळे राहुरी च्या राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे .श्री .गजानन सातभाई यांनी मात्र आपला नगरपरिषदेचा उपनगराध्यक्ष पदाचा सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा शहरांमध्ये होत आहे .
श्री .भाऊसाहेब मोरे सर यांची लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवड झाली होती त्यानंतर उपनगराध्यक्ष पदासाठी अनेकांची नावे समोर आली होती मात्र उपाध्यक्ष पदाच्या सुरुवातीला सहा महिन्याच्या कालावधीसाठी श्री .गजानन सातभाई यांची निवड करण्यात आली होती .
श्री .प्राजक्त तनपुरे यांची नुकतीच विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली त्यानंतर श्री .गजानन सातभाई यांनी सुरुवातीला सहा महिन्यासाठी उपनगराध्यक्ष पद मागितले होते मात्र जोपर्यंत श्री .प्राजक्त तनपुरे आमदार होत नाही तोपर्यंत मी उपनगर अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून सुमारे महिना दोन महिने कारभार केला मात्र आपला निर्धारित सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा सादर केला आहे श्री .गजानन सातभाई यांच्या राजीनामेमुळे राजकीय शब्द पाळत खुर्ची सोडली की आगामी राजकीय समीकरणासाठी नवी खेळी का अशी चर्चा आता राहुरी शहरांमध्ये रंगू लागली आहे त्याचबरोबर राजीनाम्यासाठी कोणाचा आग्रह होता का की त्यांनी स्वेच्छेने निर्णय घेतला याबाबतही शहरांच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मात्र या सर्व चर्चांवर पडदा टाकत श्री .गजानन सात भाई यांनी आपला निर्णय हा ठरल्याप्रमाणे सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे मी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे .

