भद्रावती पोलिसांची धडक कारवाई: १,३५,००० रुपयांच्या मुद्देमालासह गांजाची अवैध वाहतूक करणारी महिला आरोपी अटकेत
(महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)
भद्रावती दिनांक ०५/०९/२०२६ रोजी मा. प्रभारी अधिकारी परी पो. उप अधिक्षक सचिन खेत्रे पोलीस स्टेशन भद्रावती यांच्या मार्गदर्शनात पो. स्टे.
हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सायवन हायवे रोडवर नाकाबंदी करून एका महिलेकडून गांजा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरकडून भद्रावतीकडे हिरव्या रंगाच्या सुझुकी मोपेडवरून एक महिला आरोपी अवैधरित्या गांजा (अमली पदार्थ) वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा व वरिष्ठांच्या परवानगीने सायवन हायवे रोडवर प्रभारी अधिकारी परी पो. उप अधिक्षक सचिन खेत्रे व पो स्टाफ टीम ने नाकाबंदी करून मोपेड चालक महिलेस ताब्यात घेण्यात आले.
जप्त केलेला मुद्देमाल:
1) दोन प्लास्टिक पुडक्यात प्रत्येकी १ किलो १० ग्रॅम (किंमत अंदाजे रु. २०,०००/-) व १ किलो १६ ग्रॅम (किंमत अंदाजे रु. २०,०००/-)
2) एक मोबाईल: जुना वापरता निळ्या रंगाचा ॲपल आयफोन ११, IMEI क्र. 351066253319681 (किंमत अंदाजे रु. १५,०००/-)
3) वाहन: सुझुकी कंपनीची मोपेड क्र. MH 34 CS 1752 (किंमत अंदाजे रु. ८०,०००/-)
एकूण जप्त मुद्देमाल: रु. १,३५,०००/-
आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कलम ८ (क), २० (ब)(II)(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक:
सदर कारवाई परि. पोलीस उपअधिक्षक श्री. सचिन एस. खेत्रे, सपोनि. संजय मिश्रा, पोउपनि संतोष केदार, सफौ. महेंद्र, पो.हवा. गोपाल, देवानंद, प्रशांत,अनुप, धर्मराज, पो.अं. योगेश, संतोष, खुशाल, किरण, नितीन व मपोअं. रागिनी, पुजा, मोनाली तसेच भद्रावती पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे.

