अवैध गुटखा प्रकरणातील आरोपी विरुद्ध ग्रामपंचायत ची घर पाडण्याची नोटीस..अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले इतर अवैद्य धंद्यावरही कारवाई करण्याची नागरिकांची मागणी..

अवैध गुटखा प्रकरणातील आरोपी विरुद्ध ग्रामपंचायत ची घर पाडण्याची नोटीस..
अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले इतर अवैद्य धंद्यावरही कारवाई करण्याची नागरिकांची मागणी..

(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )


राहुरी तालुक्यामध्ये मागील आठवड्यात गुटखा सुगंधित तंबाखूचा अवैध व्यापार करण्याविरुद्ध गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात गुटखा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त केला होता या प्रकरणात आरोपीवर अटकेची कारवाई करण्यात आली त्यानंतर आता राहुरी खुर्द ग्रामपंचायत तिने संबंधित आरोपी विरुद्ध त्यांच्या घराच्या बांधकामाबाबत थेट नोटीस बजावल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनीही आठ दिवसात राहुरी तालुक्यातील गुटखा तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी करत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत तिने बजावलेल्या नोटीसी कडे विशेष गांभीर्याने पाहिले जात आहे .
ग्रामपंचायत नोटीसीनुसार आरोपी पवन दगडू सिंग गिरासे यांच्या मिळकत क्रमांक0044 / 3मध्ये आर .सी .सी .बांधकामाची निवासी म्हणून नोंद आहे मात्र या ठिकाणी गुटखा तंबाखूजन्य पदार्थ व इतर मालाची साठवणूक करून त्याची अवैध्य विक्री केली जात असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या कारवाईत समोर आल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे निवासी प्रयोजनासाठी वापरणे अपेक्षित असलेल्या जागेला शासन बंदी असलेल्या गुटखा सुगंधित तंबाखू व इतर अवैध्य व्यवसायासाठी वापर केल्याने रहिवाशी क्षेत्राच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचे ग्रामपंचायतीने केले आहे त्यामुळे संबंधित बांधकाम अनधिकृत ठरत असल्याने ते बांधकाम पाडण्याची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत पंधरा दिवसाच्या आत लेखी खुलासा व म्हणे ग्रामपंचायत समोर सादर करण्याचे आदेश नोटीसद्वारे आरोपीस देण्यात आले आहे ग्रामपंचायतीच्या या कारवाईमुळे आयुर्वेदिक व्यवसाय करणाऱ्यांची चांगलेच धाबे दणाणले असून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ प्रमाणेच अवैध्य दारू मटका गांजा वाळू तस्करी करणाऱ्या धंद्यावरही शासनाने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .
Previous Post Next Post