नेताजी सुभाष विद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धा संपन्न ....( चार ही संघाने विजयी बाजी मारली )

नेताजी सुभाष विद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय हॅन्डबाॅल स्पर्धा संपन्न ....

( चार ही संघाने विजयी बाजी मारली )


(मानवत परभणी संपादक / अनिल चव्हाण)


मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या 
नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानवत येथे जिल्हास्तरीय "हँडबॉल स्पर्धा" संपन्न विद्यालयामध्ये जिल्हास्तरीय "हँडबॉल स्पर्धेचे" उद्घाटन करण्यात आले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.संजयजी लाड, उपमुख्याध्यापक मा. श्री.व्ही.पी.बुधवंत, प्रमुख पाहुणे क्रीडा अधिकारी परभणी येथील मा. श्री.सुयश नाटकर, योगेश सर, श्रीअशोक काळे सर, श्रीमती कुसुमताई कनकुटे मॅडम, क्रीडा शिक्षक संजयजी जाधव हे होते. यावेळी विद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुणे यांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील चार ही संघ विजयी घोषित करण्यात आले यामध्ये सतरा वर्षे खालील मुले आणि मुली तसेच 14 वर्षे खालील मुले आणि मुली असे चार संघ विजयी झाले सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे विद्यालयाच्या वतीने, व सर्व शिक्षक बांधव, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने विभागीय खेळासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले.




*****
Previous Post Next Post