बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली इमामपूरमध्ये गणेश अनंत चतुर्थी निमित्त कीर्तन सोहळा संपन्न..
गणरायाच्या भक्तीत रंगले इमामपूर; कीर्तन व महाप्रसाद सोहळा संपन्न..
(बीड/ प्रशांत बाफना महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)
गणेशोत्सवानिमित्त इमामपूर, येथे युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य कीर्तन सोहळा शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमात ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (मठाधिपती बंकटस्वामी महाराज संस्था, नेकनूर) यांनी कीर्तनाच्या माध्यमातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक व सामाजिक संदेश दिला. गणेशभक्ती, संतविचार आणि अध्यात्माच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
कीर्तन सोहळ्यादरम्यान भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी मोठ्या उत्साहाने कीर्तनाचा लाभ घेतला. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांसाठी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाची सांगता केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमातून भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धर्मवीर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी, युवा सैनिक शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

