बैलपोळ्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना उद्या सुटी!१० सप्टेंबर रोजी सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळा राहणार बंद; शिक्षण विभागाचा आदेश

बैलपोळ्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना उद्या सुटी!

१० सप्टेंबर रोजी सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळा राहणार बंद; शिक्षण विभागाचा आदेश..

 (महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक.रावेर — शेख शरीफ)

बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांना गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद जळगावच्या शिक्षण विभागाने ९ सप्टेंबर रोजी अधिकृत आदेश काढला आहे.
जिल्हा परिषद, जळगाव शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या आदेशानुसार, बैलपोळा सणानिमित्त जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना एक दिवसाची सुटी देण्यात आली आहे. या आदेशाची माहिती जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी तसेच प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) निलेश दे पाटील यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम-२००९ तसेच शासन परिपत्रकाचा संदर्भ देण्यात आला आहे.
त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व संबंधित शालेय व्यवस्थापनाने गुरुवार, १० सप्टेंबर रोजीची सुटी लक्षात घ्यावी, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Previous Post Next Post