श्री साई I.T.I. मधील रोजगार मेळावा पुढे ढकलला
महेश निमसटकर
ज़िल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
भद्रावती दी 28 : श्री साई I.T.I., भद्रावती येथे उद्या दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन युवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. मात्र, निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रोजगार मेळाव्याची नवीन तारीख व वेळ नंतर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. तरी सर्व उमेदवार, विद्यार्थी, पालक तसेच संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री साई I.T.I. प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

