*एस.टी.च्या सवलतधारक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी आता १ ऑक्टोबर २०२६ पासून एन.सी.एम.सी. कार्ड अनिवार्य,*
*मुंबई- जिल्हा प्रतिनिधी
*महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक*,
*ज्येष्ठ नागरिक*
आणि
*महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एन.सी.एम.सी. (N.C.M.C.) कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे*.
*सवलतीचे तिकीट देताना N.C.M.C. कार्डचा वापर करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला असून*,
*त्यासाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार*
आणि
*बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे*.
१ ऑक्टोबर २०२६ पासून सवलतीचे तिकीट N.C.M.C. कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे.
त्यामुळे
*ज्येष्ठ नागरिक* आणि
*महिला* सवलतधारक प्रवाशांनी त्यापूर्वी N.C.M.C. कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
ज्या प्रवाशांकडे कार्यरत
(Active) N.C.M.C. कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची Q.R. कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) आपल्या प्रवासी सेवांमध्ये अद्ययावत डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचा वेग वाढवला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत राज्यभरातील लाखो प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रवासाच्या सवलतींची व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ व्हावी या दृष्टीने महामंडळ सातत्याने पावले उचलत आहे.
प्रवाशांना तिकिटासाठी रोख रक्कम देण्याची गरज भासू नये
तसेच सवलत योजनांचे व्यवस्थापन एका छताखाली यावे, यासाठी सर्व आधुनिक सुविधांची सांगड घातली जात आहे.
या नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करताना प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे.
नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी
*ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड*
यांची राज्यभरातील बसस्थानके, आगार आणि अधिकृत केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय,
*बायोमेट्रिक पडताळणी*
दरम्यान
ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे न उमटल्यास नोंदणी रखडू नये म्हणून आधार कार्डशी जोडलेल्या मोबाइलवर ओ.टी.पी. (O.T.P.) पाठवून नोंदणी पूर्ण करण्याची विशेष पर्यायी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी
*BHIM App*
द्वारे मागील बाजूचा क्यूआर कोड स्कॅन करून Top-up करण्याची सोयही देण्यात आली आहे.
या सर्व पूर्वतयारीमागील मुख्य आणि अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे-येत्या १ ऑक्टोबर २०२६ पासून एसटीच्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मिळणारे सवलतीचे तिकीट केवळ आणि केवळ *N.C.M.C. कार्ड*
द्वारेच वितरित केले जाणार आहे.
महामंडळाने या प्रवर्गांसाठी आता N.C.M.C. कार्ड अनिवार्य केले असून, ज्यांच्याकडे कार्यरत कार्ड किंवा नोंदणी केल्याची ३० दिवस वैध राहणारी Q.R. कोडयुक्त पावती असेल,
त्यांनाच सवलतीचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे सवलतीचा प्रवास विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी संबंधित पात्र प्रवाशांनी १ ऑक्टोबर २०२६ पूर्वीच आपली नोंदणी पूर्ण करून घ्यावी,
असे आवाहन एस.टी. महामंडळाने केले आहे.
***

