धक्कादायक! बीड हादरले, स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार? 7 ठिकाणाहून ग्राहकांसह महिला-तरुणी ताब्यात
(बीड/प्रशांत बाफना महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक)
बीड शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एकाच वेळी 7 स्पा सेंटरवर छापा टाकला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार सुरू असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी अनेक महिला- तरुणी आणि ग्राहकांना ताब्यात घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या मोठ्या कारवाईमुळे बीड शहर हादरले आहे. पोलिसांनी एकाच वेळी 7 स्पा सेंटरवर छापा टाकला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली अश्लील कृत्य सुरू असल्याने पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. बीड शहर आणि शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल सात स्पा सेंटर्सवर पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून अनेक महिला आणि पुरुष ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण बीड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! बीड हादरले, स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार?
अशी झाली कारवाई
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह आणि अश्लील कृत्ये चालत असल्याचा संशय पोलिसांना होता. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक नवनीत कंवत यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने ही विशेष मोहीम राबवली. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी अचानक सात ठिकाणी छापे टाकून तेथील संदिग्ध महिला व ग्राहकांना ताब्यात घेतले.
वैद्यकीय तपासणी अन् पुढील कारवाई
कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व महिला आणि पुरुष ग्राहकांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पोलिसांच्या सखोल चौकशीअंती संबंधित स्पा सेंटर्समध्ये नक्की काय प्रकार सुरू होता, याचा उलगडा होणार आहे.
दरम्यान, एकाच दिवशी आणि एकाच वेळी सात स्पा सेंटर्सवर टाकलेल्या या छाप्याने बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत

