निर्धार करिअर अकॅडमीच्या पूनम माळीची विजयी दौड; दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई
(बीड/प्रशांत बाफना : विभागीय संपादक महाराष्ट्र राज्य)
बीड येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धेत निर्धार करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी कुमारी पूनम विष्णू माळी हिने उत्कृष्ट क्रीडा कामगिरी करत दोन सुवर्णपदके आणि एका रौप्यपदकाची कमाई केली.
पूनम माळी हिने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक, 4×100 मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर गोळाफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.
तिच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल निर्धार करिअर अकॅडमीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप आघाव, संचालक डॉ. अर्चना आघाव- नागरे, प्रा. डॉ. अशोक घोळवे, क्रीडा शिक्षक रवी जायभाय, कांबळे सर व आंधळे सर यांनी पूनम माळी हिचे अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पूनमच्या या यशामुळे निर्धार करिअर अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, तिच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

