नेप्ती ग्रामपंचायतमध्ये महिलाराज , सोनाली जपकर यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड, पदापेक्षा मला नेप्ती गावाचा विकास महत्त्वाचा - उपसरपंच सोनाली जपकर.

नेप्ती ग्रामपंचायतमध्ये महिलाराज , सोनाली जपकर यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड, 

  पदापेक्षा मला नेप्ती गावाचा विकास महत्त्वाचा - उपसरपंच सोनाली जपकर.

अहिल्यानगर : प्रतिनिधी - 

नगर तालुक्यातील नेप्ती ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा महिलाराज आले असून, उपसरपंचपदी सोनाली बंडू जपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच एकनाथ जपकर यांनी इतरांना संधी मिळावी यासाठी मनाचा मोठेपणा दाखवत राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेवर सरपंच सविता संजय जपकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.

नेप्ती ग्रामपंचायतीत २०१६ मध्ये मिराताई संजय जपकर आणि वैजयंती ज्ञानेश्वर जपकर यांच्या माध्यमातून महिलाना नेतृत्वाला संधी मिळाली होती. त्यानंतर २०२६ मध्ये सरपंचपदी सविता जपकर, तर उपसरपंचपदी सोनाली जपकर यांची निवड झाल्याने ग्रामपंचायतीत पुन्हा महिलाराज प्रस्थापित झाले आहे.

नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली जपकर म्हणाल्या की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असून, शासकीय योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवला जाईल. गावात सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे केली जातील . शिक्षण व लाईट या प्रश्नावर मी विशेष लक्ष देणार आहे. गावातील विधवा व अपंग यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे .मला पदापेक्षा गावाचा विकास महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन नवनिर्वाचित उपसरपंच सोनाली बंडू जपकर यांनी केले. 

यावेळी उद्योजक संजय अशोक जपकर, माजी सरपंच मिराताई संजय जपकर, मा. उपसरपंच संजय आसाराम जपकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण पानसंबळ, मा. पंचायत समिती सदस्य देवा होले, मा. संचालक वसंत पवार, माजी उपसरपंच एकनाथ जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, चेअरमन उमर सय्यद, व्हॉइस चेअरमन रोहिणी होळकर ,ग्रामपंचायत सदस्य फारुख सय्यद, बाबासाहेब होळकर, अनिता चौगुले, दादू चौगुले, नितीन कदम, विजय होळकर, संभाजी गडाख, सोमनाथ पुंड, विमल होळकर, भाऊसाहेब होळकर, बंडू जपकर, राजेंद्र जपकर, जालिंदर शिंदे, अंबादास जपकर, मच्छिंद्र होळकर, राजाराम जपकर, अशोक जपकर, सुरेश कदम, सादिक पवार, प्रा. मल्हारी कांडेकर, प्रा. एकनाथ होले, बंडू कांडेकर, ज्ञानेश्वर जपकर, नंदू जाधव, अंबादास पुंड, अतुल जपकर, भागिनाथ जपकर, गोरख जपकर, अजय जपकर, विकास वाघ, दिनेश वाघ, संजय जपकर, भाऊ जपकर, जबाजी कर्डिले, बाळू कर्डिले, मच्छिंद्र जपकर, एकनाथ होळकर, बाबासाहेब लांडे, नाना जपकर, गोरख इंगोले, अमोल चौगुले, तुषार फुले ,दादा जपकर, सोमा जपकर, विजय जपकर, रावसाहेब जपकर, मच्छिंद्र जाधव, शिवाजी गाडेकर, राजेंद्र गाडेकर, शरद पवार, नितीन पवार, कारभारी जपकर, डॉ. भाऊसाहेब जपकर, रामदास जपकर, बाजीराव चत्तर, राजेंद्र चत्तर, गोविंद कर्डिले, शुभम जाधव, राहुल जरे, सागर जपकर, सुधाकर कदम, राजेंद्र होळकर, दत्ता कदम यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या..
Previous Post Next Post