राम शिंदे साहेब, तीन-चार महिने डाव मांडायचा, सगळ्या प्रस्थापितांच्या झोपा उडवायच्या, आणि शेवटी… अंतरात्म्याचा आवाज! तो अंतरात्मा खरा की स्क्रिप्टेड?

राम शिंदे साहेब, तीन-चार महिने डाव मांडायचा, सगळ्या प्रस्थापितांच्या झोपा उडवायच्या, आणि शेवटी… अंतरात्म्याचा आवाज! तो अंतरात्मा खरा की स्क्रिप्टेड?

(विशेष बातमी/ प्रशांत बाफना विभागीय संपादक महाराष्ट्र राज्य)


विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अख्ख्या जिल्ह्याच्या राजकारणात धुरळा उडवला होता! जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसातील शेवटच्या तासभर आधी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी लिहून आणलेले म्हणजेच स्क्रिप्टेड भाषण वाचले. ‘मी घटनात्मक पदावर आहे! या पदाची प्रतिष्ठा आणि गरीमा लक्षात घेऊन मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला आहे! आणि मी जिल्हा बँक निवडणूक लढवणार नाही’! मग, सर मागील तीन- चार महिने डाव कशासाठी मांडला? खा. लंकेंना वार्‍यावर का सोडलं? हे सारं ठरवून चाललंय का?

तहात हारले असले तरी राजकीय
वजन वाढले!
राम शिंदे यांना दाखवायचं होतं की मी पण जिल्ह्यात आहे! माझ्याशिवाय जिल्हा बँकेची निवडणूक होऊ शकत नाही! माझं वजन आहे! आणि ते दाखवण्यात ते यशस्वी झाले! तीन- चार महिने सगळे नेते त्यांच्याच भोवती फिरत होते! पक्षश्रेष्ठींकडे देखील त्यांनी त्यांच जिल्ह्यातील वजन दाखवून देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेत स्वतः न लढता देखील आपल्या समर्थकांना संचालक करण्याची खेळी त्यांनी खेळली. त्यातून दबाव निर्माण झाला आणि त्यांची स्वत:ची बार्गेनिंग पॉवर देखील वाढली.

खा. लंके यांची खरी कसोटी सुरू!
शिंदेंना भाजपचा पाठिंबा, लंकेंना शरद पवार गटाचा पाठिंबा! दोघे मिळून प्रस्थापितांना घेरणार, अशी चर्चा होती! आता शिंदेंनी माघार घेतली, तर लंके एकटे पडले! खरं तर खा. लंके वार्‍यावर पडलेले नाहीत, पण त्यांची खरी कसोटी आता लागली आहे! त्यांनी जिल्हा बँकेत लक्ष घातलंय! ते माघार घेणार नाहीत! कारण त्यांनी माघार घेतली तर त्यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज जाऊ शकतो. याशिवाय पारनेरमधून जिंकून येण्याइतपत जुळवाजुळव त्यांनी केली असणारच! राम शिंदे यांच्यासह सार्‍यांनी साथ सोडली तरी जिल्हा बँकेत निवडून आलो हे दाखविण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

जिल्हा बँक प्रस्थापितांच्या घशातून
काढायचं काय झालं?
बँक निवणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापती राम शिंदे हे रोज बैठका घेत होते. रोज दौरे करत होते. ते रोज सांगायचे, ‘जिल्हा बँक प्रस्थापितांच्या घशातून काढणार’! त्यांच्या या भूमिकेने प्रस्थापितांच्या गोटात मोठी चलबिचलनिर्माण होणे स्वाभाविकच! विखे, थोरात यांच्यासह सर्वांच्याच नजरा त्यांच्या भूमिकेकडे लागून होत्या. अन् शेवटच्या क्षणी सभापती राम शिंदे यांनी एक लिहून आणलेलं, स्क्रिप्टेड भाषण वाचलं! आणि माघारीची घोषणा केली. त्यांचा हा अंतरात्म्याचा आवाज खरा की खोटा हा प्रश्न जसा चर्चेत आला तसाच चर्चेत आलेला दुसरा विषय म्हणजे जिल्हा बँक प्रस्थापितांच्या घशातून काढायचं काय झालं?



सोनिया गांधीही म्हणाल्या होत्या ‘अंतरात्मा’! त्याची नगरमध्ये पुनरावृत्ती?
भारतीय राजकारणात अंतरात्म्याचा आवाज खूप प्रसिद्ध आहे! दोन-अडीच दशकांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद नाकारलं होतं! तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की, ‘माझ्या अंतरात्म्याचा आवाज सांगतोय, पंतप्रधान होऊ नकोस’! देशाने त्यावेळी टाळ्या वाजवल्या! त्यागाची मूर्ती म्हणून गौरव केला! पण नंतर काय झालं? सगळ्यांना कळलं हा त्याग नव्हता, ही त्यांची राजकीय मजबुरी होती! त्यावेळी त्यांना बहुमत नव्हतं, विरोध होता, म्हणून अंतरात्म्याचा आवाज आला! तशीच पुनरावृत्ती नगरमध्ये झाली का?

कायद्याचा कचाट्यातून घेतलेला निर्णय!
सभापती राम शिंदे यांना तिसरं अपत्य आहे! सहकार कायद्याने ते अपात्र आहेत! मुख्यमंत्री फडणवीस नवीन जीआर काढतील! कायदा बदलतील असं त्यांना वाटत होते. पण फडणवीसांनी जीआर काढला नाही! दुष्काळाचा प्रश्न मोठा!, एका माणसासाठी कायदा बदलला तर बदनामी! अन् जोडीने कोर्टात याचिका दाखल झाल्यास हा जीआर रद्द होण्याची नामुष्की! त्यातूनच राम शिंदेंना अंतरात्म्याचा आवाज ऐकू आला! अंतरात्म्याचा आवाज कधी लिहून आणत नाहीत! तो आवाज आतून आणि उत्सफूर्तपणे येतो.

रोहित पवारांचं भविष्य खरं ठरलं!
आमदार रोहित पवार यांनी आधीच सांगितलं होतं की, सभापती शिंदे फक्त बोलतील, प्रत्यक्ष निवडणूक लढवणार नाहीत! त्यांचं भाकीत खरे ठरले
Previous Post Next Post