दिपक गजभारे यांची पत्रकार एकता महासंघ भारताच्या मराठवाडा सचिवपदी नियुक्ती!राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रदान; पत्रकार बांधवांकडून अभिनंदन

दिपक गजभारे यांची पत्रकार एकता महासंघ भारताच्या मराठवाडा सचिवपदी नियुक्ती!

राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र प्रदान; पत्रकार बांधवांकडून अभिनंदन

मारोती एडकेवार 
जिल्हा :प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील दिपक माधवराव गजभारे यांची पत्रकार एकता महासंघ भारत या राष्ट्रीय संघटनेच्या मराठवाडा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने ४ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल नायगाव तालुक्यासह परिसरातील पत्रकार बांधव, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता आणि सन्मान जपण्याबरोबरच पत्रकारांमध्ये एकजूट निर्माण करण्यासाठी पत्रकार संघटनांची भूमिका महत्त्वाची असते. पत्रकारांच्या विविध समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविणे, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्न करणे तसेच निर्भीड पत्रकारिता आणि लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणे, या कार्याला संघटनेच्या माध्यमातून अधिक बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मराठवाडा सचिवपदाची जबाबदारी मिळाल्याने दिपक गजभारे यांच्याकडून विभागातील पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे, पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे आणि पत्रकार एकता महासंघ भारताचे संघटनात्मक कार्य मराठवाड्यात अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या नियुक्तीपत्रावर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश गंगाराम भालेराव, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय गाळे, मराठवाडा अध्यक्ष रामराव चव्हाण, महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण चन्नावार, महाराष्ट्र कोषाध्यक्ष भगवान कपसे, संस्थापक अध्यक्ष डॉ. अंकित अवरशी आणि प्रदेश संयोजक राजेंद्र रेड्डी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दिपक माधवराव गजभारे यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार बांधव, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील पत्रकारिता व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Previous Post Next Post