यावल येथे १८ ऑक्टोबरला आसेमं चा तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार व आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा..
आदर्श शिक्षक पुरस्काराचे चौथे, तर विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे अकरावे वर्ष; गुणवंत विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका व प्रमाणपत्रे सादर करण्याचे आसेमं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी यांचे आवाहन..
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
‘आसेमं’ आदिवासी सेवा मंडळ परिवार आयोजित आद्यक्रांतिकारी जननायक तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार व आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता यावल येथील पंचायत समितीच्या जुन्या सभागृहात करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे चौथे वर्ष असून, आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे अकरावे वर्ष आहे.
आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने पात्र शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सहपरिवार सन्मान करण्यात येणार आहे.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निकष
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांनी किमान तीन वर्षे आणि ३० टक्क्यांपेक्षा अधिक आदिवासी विद्यार्थी असलेल्या शाळेत सेवा केलेली असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी विशेष आणि उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचाच पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. दरवर्षी केवळ दहा शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांकडून कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जाणार नाही. शिक्षकांची निवड करण्यापूर्वी निवड समितीचे सदस्य प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन कामाची पाहणी करणार आहेत. त्यानंतरच पात्र शिक्षकांची निवड केली जाणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष
आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी सन २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या किंवा विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात येणार आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. पदवी तसेच उच्च शिक्षणात सन २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही या सोहळ्यात सहभागी होता येणार आहे.
याशिवाय कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सहपरिवार सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीने कार्यक्रमाला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका किंवा संबंधित प्रमाणपत्रे दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आयोजकांनी दिलेल्या संपर्क क्रमांकांवर संबंधित प्रतिनिधींकडे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्कासाठी पदाधिकाऱ्यांची माहिती
पुरस्कार व गुणगौरव सोहळ्याबाबत अधिक माहितीसाठी खालील प्रतिनिधींशी संपर्क साधावा.
१. मुबारक अलीखा तडवी — ९०९६४६०४०४
२. बिराज कवी — ९३५९७९५७१९
३. राजू मुशिर तडवी, मोहरद — ९१५८१४०००६
४. समीर तडवी, आभोडा — ९३२२२३३८९२
५. जुम्मा नुरखा तडवी, मोहमांडी — ९११२११७३५८ / ८२७५६९९१५०
६. कैमुर तडवी, पिप्री — ७७७४९३६१७६
७. युनुस हयात तडवी, भुसावळ — ९१६८७९९३९४
८. इरफान सर, मु. ईनगर — ९०७५१६१५५२
९. खतीब हुसेन, मुंबई — ९९७५५८१००९
१०. रमजान शालम तडवी, नाशिक — ७७९८९९३७८६
११. डॉ. लुकमान तडवी, जळगाव — ९०४९६९९४५६
आयोजक : ‘आसेमं’ आदिवासी सेवा मंडळ, महाराष्ट्र राज्य
आदिवासी समाजातील शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांनी या सोहळ्यात सहभागी होऊन उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

