सांस्कृतिक नृत्यकलेत प्रथम आलेल्या प्रिती राजू अंजनीकर,यांचे डॉ.अण्णा भाऊ साठे वाचनालयात सत्कार.

सांस्कृतिक नृत्यकलेत प्रथम आलेल्या प्रिती राजू अंजनीकर,यांचे डॉ.अण्णा भाऊ साठे वाचनालयात सत्कार.

मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड 

नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी येथे डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालयात,प्रिती राजु आंजनिकर यांचा सत्कार करण्यात आला,छोट्याशा खेड्यामध्ये सामान्य गरीब कुटुंबात जन्मलेल्या त्याच्यात असलेली कला,सांस्कृतिक नृत्यकलेत सादर करून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल,प्रिती राजू आंजनिकर विद्यार्थिनीचा डॉ. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे अभ्यासिका वाचनालयात,सत्कार करण्यात आला नांदेड येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्यकला स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक पटवण्यात प्रिती आंजनिकर यश मिळेवले आहे,ग्रामीण भागातील चिमुकल्यामध्ये अनेक कला आहे फक्त त्यांना योग्य व्यासपीठ मिळाल्यानंतर तो योग्य दिशेने यशस्वी केल्याशिवाय राहणार नाहीत, हा संदेश राजू प्रिती अंजलीकर यांनी दिला आहे 
 यावेळी,उपस्थित मातंग समाजाचे समाज अध्यक्ष भगवान एडकेवार,सामाजिक कार्यकर्ते जकोजी एडकेवार, आरोग्य विभागाचे डॉ. बालाजी लघुळकर, पत्रकार राजेश आमेटवार,सामाजिक कार्यकर्ते साहेबराव एडकेवार, वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार, वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील अंजनीकर, वाचनालयाचे ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पत्रकार मारोती एडकेवार यांनी सांगितले की, आपली कला ही प्रत्येक माणसात असते पण ती योग्य व्यासपीठावर हिमतीने दाखवणे गरजेचे आहे,सांस्कृतिक नृत्य कलेतून प्रिर्ती अंजनीकर यांनी आमच्या वाचनालय चे,विद्यार्थी असून तिला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा अभ्यासासोबतच कला जोपासणे व त्याचं योग्य व्यासपीठावर सादर करणे हे खरंच,कौतुकास्पद आहे असे यावेळी म्हणाले व डॉ. बालाजी लघुळकर यांनी विद्यार्थ्यांना आपली कला जोपासणे, व त्याचे योग्य दिशेने रूपांतर करणे,आणि स्पर्धा परीक्षांमध्ये कधीच न मागे हटणे हाच उद्देश मनाशी,बाळगून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावे, असे मार्गदर्शन केले.
Previous Post Next Post