देवळाली प्रवरातील दोन मुलासह पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल..

देवळाली प्रवरातील दोन मुलासह पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल..

(राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा कारवाडी परिसरात सोमवारी हृदय दारक घटना घडली एका विवाहित महिलेने आपल्या दोन मुलासह जीवन संपवले वंदना गणेश गाडे तसेच त्यांची मुले चैतन्य आणि जीवन गाडे यांचा या घटनेत मृत्यू झाला याप्रकरणी वंदना हिचे भाऊ प्रल्हाद नामदेव कोकाटे राहणार जोवरवाडी तालुका गेवराई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वंदना हिचे पती गणेश गाडे यांने आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
फिर्यादीनुसार वंदना हिचा विवाह 2011 मध्ये गणेश गाडे यांच्याशी झाला होता लग्नानंतर काही दिवसांनी गणेश हा वंदनाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागल्याने या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागल्याने वंदना यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला वंदना वेळोवेळी माहेरी आल्यानंतर पतीच्या संशयी स्वभावाबद्दल व मारहाणी बाबत कुटुंबीयांना माहिती दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले तसेच वंदना हिच्या माहेरच्या लोकांनी दिलेले सोन्याचे दागिने गणेशने दारू पिण्यासाठी विकलेचा आरोप ही करण्यात आला ऑगस्ट महिन्यात काकांच्या निधनानंतर माहेरी आलेल्या वंदना यांनी पतीकडून होत असलेल्या त्रासाची माहिती भावाला व आपल्या नातेवाईकांना दिल्याचे सांगण्यात आले दोन मुलांचा संसार टिकून ठेवण्याचा सल्ला वंदनाच्या माहेरच्या नातेवाईकांनी गणेशला दिला होता दरम्यान सोमवारी रात्री गणेश गाडे यांनी वंदना हिच्या भावाला फोन करून वंदना हिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली त्यानंतर ही धक्कादाय घटना वंदनाच्या माहेरी कळाली या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वंदना हिच्या हातामध्ये शवविच्छेदनाच्या प्रक्रिये दरम्यान एक चिठ्ठी आढळून आली असून ही चिठ्ठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली असून चिठ्ठी मध्ये पत्ती घालून पाडून बोलत असे व नेहमी त्रास देत असल्याचा उल्लेख चिठ्ठी असल्याचे समजते .
Previous Post Next Post