चोपडा प्रतिनिधी.रुखणखेडा व तावसे ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे ; ६ महिन्यांपासून ग्रामसेवक गैरहजर

चोपडा प्रतिनिधी.रुखणखेडा व तावसे ग्रुप ग्रामपंचायतीचा कारभार रामभरोसे ; ६ महिन्यांपासून ग्रामसेवक गैरहजर

(रुखणखेडा (ता. चोपडा) : तालुका प्रतिनिधी)

रुखणखेडा व तावसे ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात फिरकलेच नाहीत. केवळ १५ ऑगस्ट रोजी आणि एका बैठकीसाठी ते आले होते, अशी संतप्त तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

त्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. जन्म-मृत्यू दाखला, घरकुल, शौचालय, पाणीपट्टी, कर भरणा आणि इतर शासकीय योजनांच्या कामांसाठी नागरिकांना ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ग्रामसेवक कार्यालयात येत नसल्याने गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

ग्रामस्थांनी सांगितले की, कामासाठी फोन केल्यास ग्रामसेवक "तुम्हाला काय काम आहे? माझ्या घरी या" असे उद्धट उत्तर देतात. घरी बोलावून काम करण्याची त्यांची पद्धत ही नियमबाह्य आणि शेतकरी, मजूर वर्गाला त्रासदायक आहे.

ग्रामपंचायत कार्यालय हे गावकऱ्यांच्या सेवेसाठी असताना ग्रामसेवकच गैरहजर राहत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत गटविकास अधिकारी (BDO) चोपडा व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करावी आणि नियमितपणे ग्रामपंचायतीत हजर राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी रुखणखेडा व तावसे येथील ग्रामस्थांकडून होत आहे.
Previous Post Next Post