अतिक्रमणामुळे युवकाचा आत्मदहनाचा इशारा.... शिवाजी शिंदे (जिल्हा प्रतिनिधी परभणी.) नूतन महाविद्यालय ते भांडवले यांच्या घरापर्यंत अतिक्रमण हटवण्यात सर्वांना समान हक्क न दिल्यास आत्मदहनाचा इशारा.सेलू : सेलूतील नूतन महाविद्यालय ते भांडवले यांच्या घरापर्यंत नवीन रोड बांधकाम सुरू असून ते नगर रचनेनुसार 24 मीटर रोड आहे. येथील अतिक्रमण हटवण्यात दिनांक 27 आणि 28 मे 2024 रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीतील होत आहे. मात्र अतिक्रमण हटवण्यात सगळे नियम मोडून मनाला येईल तेथे आपल्या आपल्या हित संबंध सांभाळून वाटेल ते मनमानी करून एक लाईन रेषेत किंवा एक मोजमापाने न पाडता प्रशासक असून देखील राजकीय दबावापोटी स्पष्ट सर्व नागरिका समोर अन्याय करण्यात येत आहे ते अतिक्रमण हट्टविण्यात सुरुवात केली असता 18 मीटरने दोन घर पाडण्यात आली त्यानंतर लगेच दबाव आला आणि 16 मीटर करण्यात आले. चार घरे या मापाने पाडली की पुढे 20,22,24 मीटर पर्यंत वाढवत नेण्यात आले. त्यामुळे पुन्हा हे माप मनमानी 20 आणि नंतर 16 मीटर असे करण्यात आले जर 16 मीटर एका ठिकाणी केले तर 24 मीटर वाल्यांचे घर का पाडले..? आणि 24 मीटर वाले पाडले तर सगळ्यांचे 24 मीटर ने का नाही केले..? 24 मीटर वाल्यांचे घर मोजून त्यांच्या पायऱ्या देखील पाडल्या आणि अनाधिकृत बाजूने सरळ सरळ सूट देण्यात आले आहे. हे पूर्णपणे अन्यायकारक आहे संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवले आहे याबाबत किशोर बालाजी मुक्तावार यांनी 28 मे रोजी देखील अर्ज दिला पण त्यावर काही अंमलबजावणी झाली नाही. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून निर्बंध लावून अतिक्रमण हटवण्यात यावे तसेच संबंधित अधिकार्‍यांनी प्रत्यक्षदर्शी मोजमापन चेक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसेच हे अतिक्रमण सर्वांना सारखे नियम लावून पूर्ण होईपर्यंत तत्काळ रोड चे काम रोखण्यात यावे आणि न्याय द्यावा. अतिक्रमण असलेल्या जागेच्या चुकीचे पक्के रजिस्टर खरेदी करून देखील दिलेली आहे.! त्याची देखील सखोल चौकशी करावी. शासकीय नियमानुसार सर्वांना समान न्याय न दिल्यास नाईलाज असतो येणाऱ्या सहा जून 2024 रोजी किशोर बालाजी मुक्तावार यांनी प्रशासकीय अधिकारी यांना आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Previous Post Next Post