सर्पमित्राने दिले सापाला जीवनदान ... कैलास शेंडे(जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार) नंदुरबार वार्ताहर। तळोदा शहरातील शंकर नगर येथील भर वस्तीत रहिवासी शाम तेली यांच्या घराच्या अंगणात साप फिरत असल्याचे शेजारच्या आजी यांनी आपल्या डोळ्यांनी बघितल्याने आजीचा थरकाप उडाला. आपल्या परिसरातील रहिवाशांना याबाबत सांगितले असता त्यांनी लागलीच सर्पमित्र विराज गुरव यास दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यास बोलावले. त्याने जराही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती त्यांच्या आवाजामुळे साप एका घराच्या कोपऱ्यात जाऊन, एका पी.वी.सी. पाईप मध्ये घुसून बसला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी सर्पमित्र विराज गुरव व त्याच्या सहकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. त्याची लांबी आठ फुटाची असल्याने परीसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. साधारण दोन तासाच्या शिताफीने सापाला बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे घरमालक शाम तेली यांच्या जीवात जीव आला. दरम्यान सदरील साप हा दामन जातीचा बिनविषारी असल्याचा सर्पमित्र विराज गुरव यांनी सांगितले. यावेळी पुंजुसिंग राजपुत, भरत राजपूत, पवन तेली, जगदीश सुर्यवंशी, तात्या वैदू, हर्षित बारी, रविंद्र राजपूत, रोहन तेली, सोहन तेली, विश्वजित शिंदे ई. रहिवाशी उपस्थीत होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0