बोगस बियाणे तसेच वाढीव किमतीने शेतकरी हवालदिल .अशाा विक्रेत्यांवर कार्यवाही होणे गरजेचे...... कैलास शेंडे (जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार ) नंदुरबार: दि २९ पांढरे सोने लावणीचा हंगाम सुरू झाला आहे, शेतकरी कोणते बियाणे चांगले,कोणते वाण लावल्यास कमी खर्च व उत्पादन जास्त येईल याचा शोध घेत आहे,अशात बियाण्यात फसवणुक होऊ नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांतुन व्यक्त करण्यात येत आहे. काळ्या मातीत घामाचापैसा ओतून पांढरे सोनं पिकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाच्या स्वप्नाची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न काही बोगस बियाणे विक्रेत्यांकडून केला जातो. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा,धडगाव,शहादा,नवापूर, नंदुरबार तालुक्यात बोगस बियाणे विक्रीचे रॅकेट सुरू झाले आहे, असे बोलले जात आहे.संपुर्ण जिल्ह्यात हे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तळोदा,खापर, धडगाव, शहादा, अक्कलकुव्यात लाखो रुपयांच्या बियाणांची बोगस विक्री केली जात आहे. त्यात बियाण्याच्या पाकिटावर विक्री मूल्य ८५४ रू असून बळीराजा कडून विक्री मूल्याच्या पलीकडे जाऊन १२०० ते १३०० रुपये पर पाकीट घेतले जात आहे या संदर्भात बळीराजा ने विक्रेत्याला विचारणा केल्यास उत्तर देणे टाळले जात आहे.त्याचबरोबर बियाणे शिल्लक नाही असे उत्तर दिले जात आहे नाईलाजास्तव शेतकरी वाढीव रक्कम देऊन बियाणे घेत आहे तर पक्के बिल हे विक्री मूल्यानुसार मिळत आहे. 'तुम्हाला गरज असेल तर आमच्या जवळून घ्या 'अशी गर्विष्ठ भाषा विक्रेत्यांकडून वापरली जात आहे. या मुळे बळीराजा हैराण झाला असून कृषी विभागाने या बाबाकडे लक्ष गरजेचे आहे. योग्य ती कार्यवाही होत नसल्याने बोगस बियाणे विक्री करणारे विक्रीचे रॅकेट किती सक्रिय आहे हे दिसून येते. कृषी विभागाकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने अशा बियाणे विक्रेत्यांचे धाडस वाढल्याचे सांगितले जात आहे. मान्सूनला लवकरच सुरुवात होत आहे. अवकाळीच्या सरीकाही ठिकाणी बरसल्या आहेत. मागील वर्षाच्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला आहे. परंतु अशाही परिस्थितीतही बळीराजा कर्ज काढून शेतात पांढरं सोनं पिकवण्याचे स्वप्न उराशी बाळगुन जोमाने तयारीला लागला आहे. उन्हाची तिव्रता कमी होण्याची वाट पाहत आहे.यावर्षी एकशे दहा टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने यंदाचा हंगाम चांगला राहील, चांगल्या पावसाचं भाकीत हवामान विभागाने केल्याने शेतकऱ्यांचा आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजाला या हंगामात चांगलं पिक येण्याची आस आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बागायती व जिरायती कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. अशा परिस्थितीत बोगस बियाणे विक्रेत्यांनी त्यांचा धंदा सुरु केला असल्याची कुजबुज शेतकऱ्यांत सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यालगत गुजरातची सीमा आहे.बोगस बियाण्याचा पुरवठा येथुनच होतो, व्यापारी यांना सदर बियाणे कमी किंमतीत मिळते व शेतकऱ्यांना जास्त किंमतीत विकुन दाम दुप्पट कमाई होत असल्याने हे विक्रेते दरवर्षी सक्रिय होतात.प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना बोगस बियाणं, बोगस खते ,किटक नाशके या माध्यमातून मागवले जाते व शेतकऱ्यांच्या घामाच्या दामाची लुट केली जाते. कापूस लागवडीचा हंगाम सुरू होत आहे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस बियाणे विक्री मुलापेक्षा वाढीव रक्कम घेणाऱ्या खते विकणाऱ्यांच्या मुसक्या शेतकऱ्यांचा फसवणूकीचा आधी आवळाव्यात अशी अपेक्षा शेतकऱ्यांतुन व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांनीही सावधानता बाळगावी, बियाणे विकत घेताना वाढीव रक्कम न देता पक्के बिल घ्यायला पाहिजे, पक्के बिल घेतलं आणि दुर्दैवाने बियाणं बोगस निघालं तक्रार करता येईल,असे केल्याने फसवणूक करणाऱ्यांवर पायबंद बसेल, काहीही ना काही नुकसान भरपाई तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे खते ,बियाणं खरेदी केल्यानंतर पक्क्या बिलाचा आग्रह करुन ते बिल विकेत्याकडून घ्यावे, असे शेतकरी एकमेकांना सल्ला देत आवाहन करीत आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0