पेवर ब्लॉकच्या खाली दारू, तस्करीचा नाव फंडा; ट्रॅक्टर अपघातामुळे प्रयत्न फसलाअपघातात चालक ठार, नागरिकांनी दारूच्या बाटल्या केल्या लंपास. शहादा तालुका प्रतिनिधी (दिनानाथ पाटील)शहादा, ता. 28: तालुक्यातील कलसाडी रस्त्यावर पिंगाणे गावाच्या पुढे गोवा राज्य निर्मित बनावट दारूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॉलीमधील लाखो रुपये किमतीची दारू रस्त्यावर विखुरली होती. अपघात घडल्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी दारूचे खोके उचलून पोबारा केला. ट्रॅक्टर मध्ये चालक अडकल्याने जागीच ठार झाला. सदरचा दारूचे खोके ट्रेलरमध्ये ठेवून त्यावर पेवर ब्लॉक ठेवल्याने दारू तस्करीचा नवीन फंडा उघडकीस आला. शहादा-कलसाडी रस्त्यावर एक ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. या अपघाताची भीषणता एवढी होती की ट्रॉली उलटल्याचा आवाज परिसरातील एक किलोमीटर पर्यंतच्या नागरिकांना ऐकू आला. विशेष म्हणजे या ट्रॉलीमध्ये वरून पेवर ब्लॉक तर त्याखाली गोवा राज्यात निर्मिती बनावट दारूचे सुमारे ४०० पेक्षा अधिक खोके ठेवण्यात आलेले होते. ट्रॉली उलटल्यामुळे यातील पेवर ब्लॉक व बनावट दारू रस्त्यासह रस्त्याच्या पलीकडे पडले तर ट्रॅक्टरही उलटले. चालक ट्रॅक्टरमध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहादा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ट्रॉलीमधील पेवर ब्लॉक व मद्याचे खोके रस्त्यावर पडल्यानंतर ते नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसातर्फे दारू नेणाऱ्या नागरिकांना आवाहन केले जात असतानाही आरोग्यास हानिकारक असलेली ही दारू अनेकांनी लंपास केली. सदर मद्य तस्करी कोणाच्या आशीर्वादाने सुरू होती याचा शोध घेणे आवश्यक आहे. सदरची दारू गोवा राज्यात निर्मित असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असले तरी ती मध्यप्रदेश राज्यात निर्मित असण्याची शक्यता असून विक्रीसाठी गुजरात राज्यात पाठविण्यात येत असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0