हिप्परगा थडी ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन, मोठ्या उत्साहात साजरा.

हिप्परगा थडी ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन, मोठ्या उत्साहात साजरा.

मारोती एडकेवार 
 जिल्हा: प्रतिनिधी नांदेड 

नांदेड :बिलोली तालुक्यातील हिप्परगा थडी ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी हिप्परगा थंडी येथील युवा सरपंच रहेबर इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले, यावेळी,हिप्पारगा थडी येथील पोलीस पाटील, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, व उपसरपंच चंद्राबाई व्यंकट तुकडे, व सामाजिक कार्यकर्ते सय्यद इरफान, ग्रामपंचायत सेवक राजू अंजनीकर,सुनील अंजनीकर, गावातील अंगणवाडी सेविका, व मदतनीस आशा वर्कर, व सर्व गावातील सामाजिक कार्यकर्ते व गावकरी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच इनामदार मनोगत व्यक्त करून  आज कामगार दिनानिमित्त, सर्व कामगारांना शुभेच्छा दिले  व महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व गावकऱ्यांना,महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आले आहे,व ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Previous Post Next Post