रावेर तालुक्यातील चिंचाटी गावात घाणीचे साम्राज्य..नागरिकांचे आरोग्य धोक्यात.. ग्रामपंचायत चे जाणिवपूर्वक दुर्लक्ष
चिंचाटी गावातील नागरिकांच्या जिवाशी खेळ
रावेर तालुका विशेष ग्रामीण प्रतिनिधी जावेद तडवी (चिंचाटी)
रावेर तालुक्यातील चिंचाटी गावात अनेक महिन्यांपासून जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.गटारी तुडुंब भरल्याने रस्त्यावर पाणी वाहत असल्याने रहदारी सह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वेळोवेळी ग्रामस्थांकडुन ग्रामपंचायत अधिकारी , पदाधिकारी यांना सांगुन देखील ग्रामपंचायतचे अधिकारी व पदाधिकारी हे त्यांच्या जबाबदारी पासुन हात झटकत आहेत आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी पंचायत समिती रावेर तथा जिल्हा मुख्य अधिकारी यांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष देऊन चिंचाटी गावातील ग्रामस्थांना समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढावेत आणि तात्काळ योग्य उपाययोजना करुन गावातील घाणीचे साम्राज्य दुर करावे आणि ग्रामस्थांचे आरोग्य वाचवावे अशी चिंचाटी गावातील जेष्ठ नागरिकांसह , महिला आणि गावकऱ्यांची मागणी आहे..

