तंबाखू नियंत्रण काळाची गरजस्वप्निल मगरेशहर (प्रतिनिधी उमरखेड )31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिवस दरवर्षी स्वतःच्या हाताने मृत्यू ओढवतात 80 लाख लोकदरवर्षी जगभरात सुमारे 80 लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे मृत्युमुखी पडतात. या कारणास्तव या विशेष दिवशी जनतेला तंबाखू सेवनाचे धोक्याबद्दल जनजागृती केली जाते. तंबाखू खाणे शरीराला किती हानिकारक आहे. याची माहिती या विशेष दिवशीचे बराच देण्यात येत आहे. भारतात 19.8 करोड पेक्षा जास्त पुरुष तंबाखूचे सेवन करोड महिला तंबाखूचे सेवन करतात. जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये पहिला जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला तेव्हापासून या दिवशी जगभरातील लोकांमध्ये तंबाखूचे घातक परिणाम आणि त्याचे सेवन याबाबत जनजागृती केली जात आहे. आजच्या युगात तरुण पिढी ही मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होताना दिसून येत आहे शासनाने यासंदर्भात केलेल्या कठोर निर्णयाची अमलबजावणी करून. तंबाखूजन्य पदार्थाचे नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे.

Previous Post Next Post