उमरखेड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न अहले सुन्नत खिदमत कमिटीचा उपक्रम अतिश वटाणे तालुका प्रतिनिधी उमरखेडउमरखेड येथील अहले सुन्नत खिदमत कमिटी तर्फे रविवारी रहीम नगर येथील डॉ एपीजे अब्दुल कलाम शाळेत रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.ऊर्स ए ताजुशरिया च्या निमित्ताने सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली अहले सुन्नत खिदमत कमिटीच्या वतीने विविध रोग आजारी असलेल्या रुग्णांसाठी शहरातील व परिसरातील नामांकित डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्येडॉ. रघुवींद्र चालीकवार, डॉ. माधव फोले डॉ. कैलास कोल्हे, डॉ. शरद माने, डॉ कृष्णा नाईक डॉ गजानन डांगे, डॉ जय राम बस्सी, डॉ मोहम्मद गौस , डॉ जुबेर विराणी, डॉ विवेक पत्रे, डॉ मुजम्मिल खान ,डॉ आशिष खंबाळकर, डॉ. उजमा खीजर, डॉ.चिंचोलकर , डॉ. स्वप्नील वानखेडे , डॉ स्वप्निल जीवने, डॉ सानिया हुसेन, डॉ शफिक हुसेन, डॉ मोहसीन आदि डॉक्टरांनी एकूण ५४३ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून सामाजिक दायीत्व जपले.आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी कशिफ मेमन, सज्जाद खान, हनीफ सर, नेहाल रजा , जमील खतिब ,दानिश खतिब,सलीम शेख, अलीम शेख, अब्दुल जब्बार, वकार अहमद, मुबाशिर सर,तय्यब रजा,आफताब खान, नदीम खान, रेहान शेख,शेख फैजान,अल्ताफ रजा आदींनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0