परळी शहरातील भीम नगर येथून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना ऐतिहासिक मताधिक्य देणार. बालासाहेब जगतकर. परळी प्रतिनिधी---परळी शहरातील भीम नगर येथून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास ऐतिहासिक मताधिक्य देणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बीड लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील व चळवळीचा कार्यकर्ता अशोक भाऊ हिंगे पाटील यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीच्या उमेदवार पंकजा मुंडे व शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे या दोन्ही उमेदवारांना जनतेच्या प्रश्नाचे कसल्याही व कुठल्याही प्रकारचे देणे घेणे नसल्याकारणाने आपल्या हक्काचा माणूस व जवळचा माणूस म्हणून परळी शहरातील भीम नगर येथून गेल्यावेळी दीड हजार मतदान वंचित बहुजन आघाडीस झाले होते त्याच्यात दुपटीने वाढ होऊन व आपले मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या पक्षाला मत म्हणूनच यावेळेस ही लक्षणीय मतदान होणार असून तशी जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली असल्याचे दिसत आहे त्यामुळेच भीम नगर येथून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक हिंगे पाटील यांना लक्षणीय मतदान होणार असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकार द्वारे वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे

Previous Post Next Post