रावेर शहरातील भातखेडा रोड वरील रस्त्यावर झाले मोठमोठ्या खड्यांचे साम्राज्य बांधकाम खात्यासह नगरपालिकेचे देखील जाणीव पूर्वक दुर्लक्ष ..दिवसेंदिवस अपघातांना निमंत्रण. रावेर तालुका प्रतिनिधी(रशीद तडवी) तालुक्यातील रावेर शहरात भातखेडा रोडने जमजम पाणी वॉटर जवळ रोड मध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना प्रवास करीत असताना, तारेवरची कसरत करावी लागत आहे.या रोडच्या खड्ड्यांमध्ये वाहन जाताच त्या वाहन धारकाला प्रवास करीत असता खड्ड्यात रस्ता आहे का, रस्त्यात खड्डा हेच समजायला मार्ग सापडत नाही.हा सगळा प्रकार बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना माहीत असल्यावरही जाणीव पूर्वक दुर्लक्ष करूनस सबंधित अधिकारी व पदाधिकारी हे, डोळे लावून दुधावरची मलई खात आहेत. आणि सर्वसामान्य जनतेचे हाल करण्याचे काम मात्र सध्या स्थितीत सबंधित अधिकारी व पदाधिकारी करीत असल्याचे रावेर वासियानसह तालुक्यांतील जनतेकडून बोलले जात आहे..की आम्हाला खड्यात गाडल्यावरच रस्त्याचे डांबरीकरण करणार का.तरी या संपूर्ण प्रकाराकडे जातीने लक्ष देऊन तात्काळ डांबरीकरण करण्याची मागणी तालुक्यांतील जनतेसह वाहन धारका कडून रस्ता डांबीकरनची मागणी करण्यात आली आहे..पाहु या याकडे कोणी लक्ष देते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे..
byMEDIA POLICE TIME
-
0