पाण्याअभावी पैनगंगा नदीचे पात्र कोरडे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान... स्वप्नील मगरे (शहर प्रतिनिधी उमरखेड) उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीचे पात्र पाण्याअभावी मे महिन्यामध्ये कोरडे झाले . जल संसाधन विभागातील कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्याच्या गलथान कामामुळे नदी काठावरील शेतकऱ्यांना आपल्या नगदी समजल्या जाणाऱ्या ऊस या पिकाचे नुकसान सहन करावे लागले. उमरखेड व महागाव क्षेत्रातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते किसनराव वानखेडे यांनी नदीकाठच्या गावाला भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यावेळेस त्यांच्याशी बोलताना धरण आपल्या उशाला आणि कोरड घशाला अशी व्यथा शेतकरी बांधवांनी मांडली आमच्या करपलेल्या उसाचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे वन्यप्राण्याची पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेताना दिसले. पैनगंगा नदी पात्राला लागून असलेल्या साखरा , खरूस, बोरी, सिंदी, देवसरी, वडकी या सर्व गावातील शेतकरी बांधवांना पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तरी पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी वर्गात जोर धरत आहे.

Previous Post Next Post