अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुखगंभीर जखमी तरुणाला स्वतःच्या वाहनातून नेत रुग्णालयात केले भरती. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या समयसूचकतेने वाचले प्राण महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.29:- वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द येथील कृषी केंद्र उद्घाटन आटोपून पुढील कार्यक्रमा करिता वरोराकडे जात असताना सालोरी गावाजवळ चारचाकी व दुचाकीचा झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या बाजूला पडून होता. यावेळी जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जीवतोडे यांनी समयसूचकता दाखवत त्या तरुणाला स्वतःच्या गाडीतून उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल केले. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या समयसूचकतेने जखमी तरुणाला जीवनदान मिळाले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0