अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर जप्त. नांदुरा पोलिसांची कारवाई... गजानन डाबेराव (तालुका ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा ):- नांदुरा पोलिसांची.अवैध रित्या रेती चोरी करुण वाहतूक करणाऱ्या आरोपीवर नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल,२ ब्रास रेती व टिप्पर जप्त २९ मे,२०२४ रोजी रात्री नांदुरा पोलिसांनी नाकाबंदी केली असता बेलाड वरून नांदुरा येणारे टिप्पर नंबर एम एच २८ बीबी ४०७६ अशोक लेलेंड कम्पनीचे ज्यामध्ये २ ब्रास रेती क़ीमत ८००० रूपये व टिप्पर ची क़ीमत ५ लाख रूपये असा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला सदर टिप्पर चालक सुनील निनाजी पाटिल २८ रा वार्ड न १७ नांदुरा याच्या विरुद्ध रेती चोरी चा गुन्हा नोंद करण्यात आला असून पूडील तपास पो हवा राहुल ससाने व पो हवा सोळंके हे करित आहेत,

Previous Post Next Post